ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 सप्टेबर 2025 | बुधवार

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 सप्टेबर 2025 | बुधवार
By : | Edited By: अभिजीत जाधव | Updated at : 10 Sep 2025 06:22 PM (IST)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 सप्टेबर 2025 | बुधवार

1. उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर, संजय राऊत आणि अनिल परबही सोबत, सेना-मनसे युतीबाबत तीन तास खलबतं, मात्र कुंदा मावशींच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, संजय राऊतांचा दावा राज-उद्धव भेटीत पहिला धमाका, महापालिका युतीची अधिकृत चर्चा, तसेच जागावाटपावरही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती

2. शिवसेना ठाकरे गटाचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच, तर शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर, ठाकरेंच्या मेळाव्यात मनसेसोबतच्या युतीच घोषणा होण्याची शक्यता

3. मराठा समाजाला ओबीसींपेक्षा जास्त निधी, कुणबी नोंदीसंबंधी हैदराबाद गॅझेटियरच्या जीआरवरही आक्षेप, ओबीसी उपसमितीच्या पहिल्याच बैठकीत मंत्री छगन भुजबळ आक्रमक मराठा आरक्षणाबाबत अवैध दाखले देऊ नये, श्वेतपत्रिका काढावी, ओबीसी उपसमिती बैठकीत पंकजा मुंडेंची ठाम भूमिका

4. हैदराबाद गॅझेट पाठोपाठ गॅजेटसाठी शासनाकडून हालचालींना वेग, विभागीय आयुक्तांना आदेश मराठा आरक्षणातील कुणबी नोंदीसंबंधी हैदराबाद गॅझेटियरच्या जीआर विरोधात सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल, विरोधी बाजू ऐकून घेऊन निर्णय घेण्याची याचिकाकर्त्याची मागणी

5. मराठा समाजाचं EWS आरक्षण गेलं, MPSC मुख्य परीक्षेचं मेरीट SC, OBC अन् SEBC पेक्षाही कमी लागलं

6. सोन्याच्या दरात मोठी उसळी, एकाच दिवसात 2000 रुपयांनी भाव वाढला, एका तोळ्यासाठी 1 लाख 13 हजार मोजावे लागणार

7. बीडचा माजी उपसरपंच नर्तकीच्या प्रेमात वेडा झाला, बोलणं टाकल्याने सैरभैर, शेवटी तिच्याच घरासमोर डोक्याला पिस्तूल लावून खटका ओढला पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोनं घेतलं, नंतर म्हणाली बंगला नावावर करा, नर्तिकेच्या नादापायी उपसरपंचाने जीव गमावला जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, तिच्यामुळेच डोक्यात गोळी घातली, नर्तिका-उपसरपंच प्रेमाचा द एंड कसा झाला?

8. मध्ये हुंडाबळीची घटना, सासरच्या मंडळींकडून वारंवार जाच, लग्नानंतर दोनच महिन्यात विहिरीत आढळला नवविवाहितेचा मृतदेह एकतर्फी प्रेमातून शेजारच्या तरुणीवर सपासप वार, हातावरील टॅटूमुळे दहा महिन्यांनी भिवंडीतील आरोपी गजाआड

9. दुर्धर आजारपणाच्या विवंचनेतून हतबल, 81वर्षीय वृद्धाकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या, स्वतःलाही संपवण्याचा केला प्रयत्न, वसईत हृदय पिळवटून टाकणारी घटना मुलाचा कर्करोगाने मृत्यू अन् अवघ्या तीन तासातच आईनेही प्राण सोडला, एकाच चितेवर दोघांना अग्नी, नांदेडमधील मौजे उमाटवाडी हळहळली

10. आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना यूएईविरुद्ध रंगणार, संजू सॅमसन की शुभमन गिल, सलामीला कोण उतरणार याची उत्सुकता क्रिकेटपटूंनी 35 लाखांची केळी खाल्ली, उच्च न्यायालयाने BCCI ला पाठवली नोटीस, जाणून घ्या नेमकं काय प्रकरण

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

📚 Related News