मराठा समाजाचं EWS आरक्षण गेलं, MPSC मुख्य परीक्षेचं मेरीट SC, OBC अन् SEBC पेक्षाही कमी लागलं

मराठा समाजाचं EWS आरक्षण गेलं, MPSC मुख्य परीक्षेचं मेरीट SC, OBC अन् SEBC पेक्षाही कमी लागलं
By : | Updated at : 10 Sep 2025 03:15 PM (IST)

मुंबई : राज्यातील सर्वात मोठा समाज असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी करत उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत मोठं आंदोलन केलं. त्यानंतर, सरकारने हैदराबाद गॅझेटियरचा जीआर जारी करत त्यांच्या विविध मागण्या मान्यही केल्या आहेत. त्यामुळे, कुणबीचा पुरावा देणाऱ्या मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, दुसरीकडे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून 10 टक्के आरक्षण देऊ केलं आहे. त्यामुळे, समाजासमोर दोन पर्याय खुले झाले असून EWS कोट्यातील आरक्षण रद्द झालं आहे. मात्र, नुकतेच जाहीर झालेल्या मुख्य परीक्षेच्या निकालातून समोर आलेली आकडेवारी विचार करायला भाग पाडणारी आहे.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल नुकतेच जाहीर झाला आहे. त्यामध्ये, ओपन म्हणजे खुल्या प्रवर्गाचे मेरीट 507 गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून एसईबीसी म्हणजेच मराठा समाजाच्या उमेदवारांसाठीची मेरीट 490.75 एवढे आहे. मराठा उमेदवारांना आता SEBC किंवा पात्र असल्यास OBC असे दोनच प्रवर्ग उपलब्ध आहेत. मराठा उमेदवार EWS कोट्यातून बाहेर पडल्याने येत्या काळात सरळसेवा पदभरतीत देखील EWS चा कट ऑफ कमी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, येत्या काळात EWS प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारांना सुगीचे दिवस येतील. कारण, कमी गुणांवर सुद्धा आपली निवड होऊ शकते हेच नुकतेच जाहीर झालेल्या निकालातून समोर आलं आहे. त्यामुळे, ओपन कॅटेगिरीतील तरुणांनी संधी सोडू नये. कारण, यापुढे OBC प्रवर्गातच विद्यार्थ्यांमध्ये नोकरीसाठी प्रचंड स्पर्धा पाहायला मिळू शकते. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य या ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आलेला निकालाचा आकडा नक्कीच आरक्षण प्रवर्गाचा आणि ईडब्लूएस आरक्षणाच्या मेरीटचा विचार करायला लावणारा आहे.

Open : 507.50

SEBC : 490.75

OBC : 485.50

SC : 445.75

EWS : 445.00

मराठा समाजा ईडब्लूएसमधून आधीच बाहेर

सरकारने मराठा समाजाला SEBC प्रवर्गातून आरक्षण दिल्याने ते EWS मधून आधीच बाहेर पडले आहेत. त्यामुळे, EWS प्रवर्गात सध्या असणारी लोकसंख्या आणि जातींचा विचार करता त्यांना स्पर्धा कमी असेल. तर, कुणबी प्रमाणपत्र मिळवून बहुसंख्य मराठा-कुणबी उमेदवार OBC मध्ये गेल्याने ओबीसी प्रवर्गात स्पर्धा वाढली आहे. आगामी काळात अनेक मराठा तरुण, समाजातील नागरिक ओबीसीमध्ये जाणार आहेत. त्यामुळे, ओबीसीमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होऊ शकतो, कदाचित ओपन प्रवर्गापेक्षा ओबीसीचे मेरीट अधिक लागण्याची शक्यता आहे. SC, ST, VJ, NT प्रवर्गात आहे तशीच स्पर्धा असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

📚 Related News