Astrology Panchang Yog 10 September 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 10 सप्टेंबर 2025 चा दिवस आ. आजचा दिवस आपण भगवान श्री गणेशाला समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी संकष्ट चतुर्थी देखील आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला फार महत्त्व आहे. आज चंद्राने संक्रमण करुन मेष राशीत प्रवेश केला आहे. तसेच, आजच्या दिवशी नवम पंचम योग आणि वृद्धी योगासह अनेक शुभ संयोग जुळून आलेले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाला महत्त्वाचं स्थान आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस फार लाभदायी असणार आहे. या राशीवर बाप्पाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुम्ही नोकरीत बदल करु शकतात. तसेच, तुमच्यातील कलागुणांना नवीन वाव मिळवून देऊ शकतात. नवीन प्रयोग करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. तसेच, तुम्ही आर्थिक गोष्टींचं नियोजन करु शकता. जर तुमचा बाहेर जाण्याचा प्लॅन असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. संध्याकाळच्या वेळी गणपती मंदिरात जा आणि गणपतीला दुर्वा वाहा. तसेच, आजपर्यंत बाप्पााने दिलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहा.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाचा असणार आहे. तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. नशिबाचे फासे तुमच्या दिशेने पलटणार आहेत. त्यामुळे कोणतंही कार्य करताना आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे करा. यश तुमचंच आहे. तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. जोडीदाराची साथ महत्त्वाची ठरेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांवर बाप्पाचा आशीर्वाद असणार आहे. आज तुमचा दिवस धनसंपत्तीचा असणार आहे. आजच्या शुभ योगामुळे तुमच्या आर्थिक संपत्तीत भरभराट होण्याची शक्यता आहे. अचानक झालेल्या धनलाभामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. तसेच, नवीन कार्य करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळेल. मित्रांचा सहभाग तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी आजचा दिवस सुख समाधानाचा असणार आहे. आज तुम्ही हाती आलेली संधी दवडून चालणार नाही. या संधीचा चांगला लाभ घ्या. तसेच, प्रामाणिकपणे तुमचं कार्य करत राहा. संध्याकाळच्या वेळी धार्मिक कार्यात सहभागी व्हा. तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.