Chhagan bhujbal Devendra Fadnavis: राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात 2 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले असून सत्तेतील जेष्ठ ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ आपल्याच सरकारवर नाराज आहेत. तर मंत्री भुजबळ यांनी आता सरकार विरोधात दंड थोपटले आहेत. त्यांनी जीआर विरोधात न्यायालयात जाण्याची देखील तयारी दर्शवली आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ आणि राज्याचे मुख्यमंत्री हे आज (10 सप्टेंबर) एकाच व्यासपीठावर येणार आहे. नाशिकमध्ये इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबच्या उद्घाटन कार्यक्रमाला भुजबळ आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे.
दरम्यान चार दिवसांपूर्वीच भुजबळ यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून टेस्टिंग लॅबचे उद्घाटन करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर तातडीने टेस्टिंग लॅब उद्घाटन करण्याचा निर्णय झाला असून आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या टेस्टिंग लॅबचे उद्घाटन होत आहे. मात्र राज्यातील ओबीसी- मराठा वादाच्या आणि मंत्री भुजबळांच्या नाराजीनाट्यांवर या कार्यक्रमात नेमकं काय होतं, याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणाच्या जीआरच्या मुद्यावर भुजबळ नाराज
दुसरीकडे, मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर मंत्री भुजबळ नाराज असल्यानं त्यांची नाराजी दूर करण्यासाठी, त्यानं गोंजारण्यासाठी तत्काळ उदघाटन करण्याचा निर्णय झाला का? याबाबतीत राजकिय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तर मराठा आरक्षणाच्या जीआरच्या मुद्यावर भुजबळ नाराज असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समवेत मंत्री भुजबळ एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्याने या वेळी दोन्ही नेते नेमकं काय बोलतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एकीकडे सरकारने काढलेल्या GR विषयी नाराजी व्यक्त करत भुजबळ यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा दिलाय इशारा दिला असताना त्यांच्या नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्याना यश येतं का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. अशातच आजच्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, मंत्री गिरीश महाजन हेही उपस्थित राहणार आहे.
काय आहे इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब?
- नाशिकच्या शिलापूर परिसरातील (सीपीआरआय) सेंट्रल पावर रिसर्च इन्स्टिट्यूट टेस्टिंग लॅबचे आज उद्घाटन होणार
- या टेस्टिंग लॅबमुळे आगामी काळात नाशिकला इलेक्ट्रिक हब म्हणून चालना मिळणार
- ातील पहिला आणि भारतातील तिसऱ्या इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे आज उद्घाटन होणारे
- या टेस्टिंग लॅबमुळे नाशिकसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील उद्योगांना फायदा होणार
- इलेक्ट्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांचा वेळ आणि पैसा देखील वाचणार आहे
- 216 कोटी रुपये खर्च करून 100 एकर क्षेत्रावर उभारण्यात आलाय प्रकल्प
- विद्युत उपकरणे निर्मिती आणि त्याच्या गुणवत्ता ची तपासणी करण्यासाठी टेस्टिंग लॅबचा उपयोग होणार आहे
- या माध्यमातून रोजगार निर्मिती होण्यास चालना मिळणार असून जगाच्या विद्युत बाजार पेठेच्या नकाशावर नाशिकचे नाव ही समाविष्ट झाले आहे
- धार्मिक नगरी अशी ओळख असणाऱ्या नाशिकची आता एलट्रिकल हब अशी नवी ओळख निर्माण होण्यास आणि च्या औद्योगिकीकरणला कलाटणी मिळण्यास देखील मदत होणार आहे.
हेही वाचा