Guru Shani Gochar 2026 : नव्या वर्षाची सुरुवातच होणार धमाकेदार! 'या' राशींवर असणार गुरु-शनिचा आशीर्वाद, हातात मिळालेल्या संधीचं सोनं कराल

Guru Shani Gochar 2026 : नव्या वर्षाची सुरुवातच होणार धमाकेदार! 'या' राशींवर असणार गुरु-शनिचा आशीर्वाद, हातात मिळालेल्या संधीचं सोनं कराल
By : | Updated at : 30 Oct 2025 08:41 AM (IST)

Guru Shani Gochar 2026 :नवीन वर्ष 2026 सुरु व्हायला अवघा काही कालावधीच शिल्लक आहे. या नव्या वर्षात ग्रहांच्या चालीने अनेक राशींच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडणार आहेत. यावर्षी गुरु ग्रह (बृहस्पती) कर्क आणि सिंह राशीत संक्रमण करणार आहेत. तर, शनि देव मीन राशीत विराजमान असणार आहेत. गुरु-शनिच्या या चालीने काही राशींसाठी येणारा काळ वरदान ठरणार आहे.

या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा दोन मुख्य ग्रह आपली स्थिती बदलतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळतो. हा काळा काही राशींसाठी सतर्कतेचा असतो तर काही राशींच्या नशिबाचे दार उघडणारा असतो. नवीन वर्षात गुरु आणि शनि ग्रहाच्या वक्री चालीने कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात. 2026 वर्षात गुरु आणि शनिच्या संक्रमणाने तीन राशींच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.

या राशींना प्रगती, आर्थिक समृद्धी आणि आत्मविश्वासाचे नवे मार्ग उपलब्ध होतील. या ग्रहांच्या शुभ दृष्टीने ज्या राशींना लाभ मिळणार आहे त्यांनी संयम, परिश्रम आणि सकारात्मक विचार ठेवण्याची गरज आहे. वृषभ रास (Taurus Horoscope) वृषभ राशीसाठी गुरु आणि शनीची चाल सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. तसेच, आर्थिक स्थिती मजबूत असेल.

कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, जोडीदाराबरोबर चांगला संसार कराल. या दरम्यान तुम्हाला तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेण्याची गरज आहे. मिथुन रास (Gemini Horoscope) मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 अनेक शुभ संकेत घेऊन येणार आहे. या काळात गुरु-शनिची अनुकूल स्थिती असल्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल.

तसेच, संवादकौशल्य, मिडिया, मार्केटिंगशी संबंधित लोकांसाठी हा काळ प्रगतीचा असणार आहे. तुमची कठीण परिस्थितीतून सुटका होईल. तूळ रास (Libra Horoscope) तूळ राशीसाठी नवीन वर्षाचा हा काळ फार सुखकारक असणार आहे. शनी-गुरुच्या सकारात्मक स्थितीने फक्त कुटुंबातच नाही तर तुमच्या आत्मविश्वासावर देखील फरक पडलेला दिसेल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. शिक्षणासंबंधित काही ठोस निर्णय घेऊ शकता. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ).

📚 Related News