Lucky Zodiac Signs : ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवशी 'या' 5 राशी होतील मालामाल; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, 'या' वेळेत मिळतील शुभ संकेत

Lucky Zodiac Signs : ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवशी 'या' 5 राशी होतील मालामाल; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, 'या' वेळेत मिळतील शुभ संकेत
By : | Updated at : 30 Oct 2025 04:07 PM (IST)

Lucky Zodiac Signs On 31 October 2025 :ज्योतिषशास्त्रानुसार, उद्या 31 ऑक्टोबरचा दिवस आहे. ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस असल्या कारणाने उद्याचा दिवस काही राशींसाठी फार महत्त्वाचा आहे. तसेच, हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे भक्त या दिवशी देवीची पूजा करतात. तसेच, आपल्या कर्माबद्दल क्षमा मागतात.

नुकताच नवपंचम राजयोग तयार झाला आहे तसेच, त्रिएकादश योगसुद्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस कोणत्या राशींसाठी भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात. वृषभ रास (Taurus Horoscope) वृषभ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस फार आनंददायी असणार आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात फार चांगली असेल. तसेच, जवळच्या नातेवाईकांशी तुमच्या भेटीगाठी होतील.

व्यवहार करताना डील करताना विचारपूर्वक डील करा. पैशांचा प्रवाह सामान्य राहील. दुपारनंतरचा काळ चांगला असणार आहे. मिथुन रास (Gemini Horoscope) मिथुन राशीसाठी उद्याचा दिवस भाग्याचा असणार आहे. या काळात तुमच्या मानसिक समस्या दूर होतील.

तसेच, तुम्ही जो निर्णय घ्याल त्यात तुम्हाला समाधान मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. संध्याकाळच्या वेळी धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. उत्पन्नाचे अनेक मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तूळ रास (Libra Horoscope) तूळ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस उत्साहाचा असणार आहे.

तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. उद्याच्या दिवसात कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. तसेच, सकारात्मक गोष्टींचा विचार करा. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. मित्र-मैत्रीणींशी सलोख्याने संबंध राखा.

मकर रास (Capricorn Horoscope) मकर राशीसाठी उद्याचा दिवस समृद्धीचा, भरभराटीचा असणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. उद्या दिवसभरात तुम्हाला शुभवार्ता मिळू शकेत. तसेच, समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल.

तुमच्या कामाचं बॉसकडून कौतुक होईल. कुंभ रास (Aquarius Horoscope) कुंभ राशीच्या लोकांच्या दिवसाची सुरुवात फार चांगली होणार आहे. अनेक नवीन गोष्टी शिकण्याची तुम्हाला संधी मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तसेच, घरात तुमच्या आनंदी वातावरण असल्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल.

तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. आरोग्यात सुधारणा दिसेल. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ).

📚 Related News