Bhaskar Jadhav on Krupal Tumane : यांनी नुकतंच नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक मोठा दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे अनेक आमदार आणि माजी नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत. लवकरच ते शिवसेना पक्षात प्रवेश करतील. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे, असे कृपाल तुमाने यांनी म्हटले. ठाकरेंचे 2 आमदार वगळता बाकीचे सर्व शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे तुमाने म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दसरा मेळावा झाल्यानंतर आम्ही मुहूर्त काढणार आहोत. ठाकरेंचे 2 आमदार सोडून बाकी सर्व आमच्या संपर्कात आहेत. जे उरले सुरले नगरसेवक आहेत, त्यातील 80 टक्के नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा तुमाने यांनी केला होता. अनेक आमदार संजय राऊत यांच्या भूमिकेवर नाराज आहेत, असा दावा देखील कृपाल तुमाने यांनी केलाय. दसरा हा शिवसेनेसाठी महत्त्वाचा दिवस असतो आणि याच दिवशी अनेकदा पक्षाच्या मोठ्या घोषणा झाल्या आहेत. यावेळीही दसऱ्यानंतर मोठा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे संकेत देखील कृपाल तुमाने यांनी दिले आहेत. दरम्यान, कृपाल तुमारे यांच्या दाव्यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, कोण तुमाने, यांना मी ओळखत नाही असा टोला त्यांनीलगावला.
राज्यात आमसभा हा विषय संपुष्टात येते की काय अशी भीती
वर्षातून एकदा आमसभा व्हावी अशी तरतूद आहे. मात्र राज्यात आमसभा हा विषय संपुष्टात येते की काय अशी भीती भास्कर जाधव यांनी आमसभेबाबत व्यक्त केली. राज्यात जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडाला आहे. त्यातही त तर या योजनेचा पार बोजवारा उडाला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांना आकडेवारी सहित स्पष्ट करुन दाखवलं आहे. काम कमी आणि पैशांची उचल जास्त झाल्याचे पुराव्यासहित लक्षात आणून दिले आहे. मात्र, मंत्रालयात चौकशी समिती नेमतो असे सांगून अद्याप समिती नेमली नाही. बारक्या फणसाला म्हैस जामीन राहिल्याचा हा प्रकार असल्याचे म्हणत भास्कर जाधव यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाचा अंबादास दानवे यांचा कार्यकाल संपल्यामुळे ती जागा काँग्रेसला द्यायचा आमचा निर्णय झाला आहे. त्यामुळं ते मुख्यमंत्र्यांना भेटले यात काही गैर नसल्याचे भास्कर जाधव म्हणाले.