Pitru Paksha 2025: हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे. हा काळ आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतो. पितृपक्ष पंधरवडा हा 7 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाला असून जो 21 सप्टेंबरपर्यंत चालेल. या काळात तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध कर्माद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. असे मानले जाते की, पूर्वजांच्या आशीर्वादाने जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्ती वाढते. परंपरेनुसार, श्राद्ध कर्मात कावळ्यांना अन्न अर्पण केले जाते. कारण कावळा हा पूर्वजांचा दूत मानला जातो. असे मानले जाते की, जेव्हा कावळा अन्न घेतो तेव्हा असे समजते की पूर्वजांनी नैवेद्य स्वीकारला आहे. परंतु अनेक वेळा असे घडते की श्राद्धाच्या वेळेस कावळा दिसत नाही. अशात लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की जर पितृपक्षात कावळा आढळला नाही तर कोणाला अन्न अर्पण करावे? जर तुमच्यासोबतही असे काही घडत असेल तर जाणून घ्या या परिस्थितीत काय करावे? शास्त्रात याबाबत काय म्हटलंय? जाणून घ्या..
पितृपक्षात कावळा न सापडल्यास काय करावे?
हिंदू धर्मात पितृपक्षात कावळ्याला खायला घालणे हे खूप महत्वाचे मानले जाते. असे म्हटले जाते की, जर कावळ्याने अन्न खाल्ले असेल तर तुमच्या पूर्वजांनी अन्न खाल्ले आहे. पितृपक्षात जेव्हा श्राद्ध करतात तेव्हा कावळ्यासाठी अन्न बाजूला ठेवले जाते, काही वेळेस ते अन्न छतावर किंवा बाल्कनीत ठेवले जाते. परंतु अनेक वेळा असे घडते की या काळात कावळा दिसतच नाही. अशा परिस्थितीत, शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की श्राद्धाच्या वेळेस कावळा दिसला नाही, तर ते अन्न कुत्र्याला किंवा गायीला देता येते.
श्राद्ध कर्माचे पाणी कुठे ओतावे?
पितृपक्षात पिंपळाच्या झाडाची पूजा करणे देखील विशेष महत्वाचे आहे असे मानले जाते. पिंपळाचे झाड हे पूर्वजांचे प्रतीक मानले जाते. अशा परिस्थितीत श्राद्धात पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून पूर्वज प्रसन्न होतात. म्हणूनच पितृपक्षात पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे महत्त्व सांगितले आहे. त्याच वेळी, श्राद्धादरम्यान असलेले पाणी देखील पिंपळाच्या झाडात ओतले पाहिजे. काही लोक हे पाणी नाल्यात किंवा सिंकमध्ये ओततात जे पूर्णपणे चुकीचे आहे.
श्राद्धादरम्यान काय खाऊ नये
श्राद्धादरम्यान काही नियम पाळावे लागतात. यावेळी लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादी तामसिक अन्न सेवन करू नये. विशेषतः श्राद्ध आणि तर्पण करणाऱ्यांनी तामसिक अन्न अजिबात खाऊ नये. श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने श्राद्ध केल्यानंतर कावळा, गाय आणि पंडितजींना अन्न दिल्यावरच अन्न खावे.