Leave Request : माझा ब्रेकअप झालाय, सावरण्यासाठी थोडा वेळ हवाय; कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने बॉसला सुट्टीसाठी पाठवलेला ई-मेल व्हायरल

Leave Request : माझा ब्रेकअप झालाय, सावरण्यासाठी थोडा वेळ हवाय; कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने बॉसला सुट्टीसाठी पाठवलेला ई-मेल व्हायरल
By : | Updated at : 30 Oct 2025 11:04 AM (IST)

:अनेकदा आपण सुट्टीसाठी आपल्या मॅनेजरला मेल लिहत असतात. बाहेर जाण्याची वेळ आल्यामुळे काही वेळा सुट्टीचं खरं कारण वैयक्तिक असल्याने दुसरं कारण सांगावं लागतं. मात्र, अलीकडेच एका Gen Z कर्मचाऱ्याने पाठवलेला सुट्टीचा ईमेल सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल (Gurgaon CEO calls employees breakup leave) झाला आहे. कारण, या ईमेलमध्ये त्याने दिलेलं सुट्टीचं कारण अगदी अनपेक्षित आणि सगळ्यांनाच थक्क करणारं आहे. (Gurgaon CEO calls employees breakup leave) गुरगावमधील ‘नॉट डेटिंग’ या कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ जसवीर सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (माजी ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे.

त्यांनी आपल्या एका कर्मचाऱ्याचा “सर्वात प्रामाणिक सुट्टीचा अर्ज” दाखवला आहे. जसवीर यांनी या पोस्टसोबत लिहिले, “Gen Z काहीही लपवत नाही”, म्हणजेच आजची पिढी आपल्या भावना आणि मानसिक आरोग्याशी संबंधित गोष्टी निःसंकोचपणे व्यक्त करते. (Gurgaon CEO calls employees breakup leave) Leave Request :कामावर लक्ष केंद्रीत करण्यात होत होती अडचण या घटनेबद्दल बोलताना जसवीर सिंह म्हणाले की, त्यांना त्यांच्या एका कर्मचाऱ्याकडून ईमेल आला होता. त्या ईमेलमध्ये वैयक्तिक कारणामुळे काही दिवसांची रजा मागण्यात आली होती. संबंधित कर्मचाऱ्याने स्पष्टपणे लिहिले होते की, ब्रेकअपनंतर कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत आहे, त्यामुळे स्वतःला सावरण्यासाठी काही दिवसांची गरज आहे.

त्या अर्जात लिहिले होते , “अलीकडेच माझं ब्रेकअप झालं आहे आणि मी सध्या कामावर लक्ष देऊ शकत नाही. मी आज घरून काम करत आहे, मला २८ ते ८ तारखेपर्यंत सुट्टी घ्यायची आहे. ” Leave Request : लोकांनी बॉसच्या निर्णयाचं कौतुक केलं या पोस्टनंतर अनेकांनी त्या कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचं आणि जसवीर सिंह यांच्या प्रतिसादाचं कौतुक केलं. काहींनी म्हटलं की, आता ऑफिस कल्चर बदलत आहे, लोक मानसिक आरोग्य आणि भावनांबद्दल खुल्या मनाने बोलू लागले आहेत, हे सकारात्मक आहे. अनेक यूजर्सनी जसवीर सिंह यांना विचारलं, “तुम्ही रजा मंजूर केली का?” त्यावर जसवीर हसत म्हणाले, “हो, लगेच मंजूर केली.

” या उत्तरानंतर लोकांनी त्यांच्या या निर्णयाचंही भरभरून कौतुक केलं. काही यूजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. एकाने लिहिलं,“हे अगदी ठीक आहे, आणि जर कारण सांगितलं नाही तरी चालेल. ” तर यूजरने गंमतीत म्हटलं, “काही लोक तर लग्नासाठीही एवढी सुट्टी घेत नाहीत!” त्यावर जसवीर सिंह हसत म्हणाले, “पण माझं असं मत आहे की, ब्रेकअपसाठी लग्नापेक्षा जास्त सुट्टी लागते!”.

📚 Related News