Mumbai Children Hostage:मुंबईतील पवईमध्ये वेब सिरीजच्या कास्टिंगसाठी आलेल्या मुलांना ओलिस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. पवई पोलिसांनी सर्वांची सूखरुप सुटका केल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. ओलिस ठेवणाऱ्याचे रोहित आर्य नाव असून त्याने मुलांना आरए स्टुडिओमध्ये नेत ओलिस ठेवलं होतं. पवई पोलिसांनी मुलांना सुरक्षितपणे वाचवले. सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली.
रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान एक ज्येष्ठ महिला आणि लहान मुलगी जखमी झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस हवालदार शिवाजी सावंत यांनी महिलेला सुखरूप वाचवलं. पोलिसांनी 17 मुलांसह 19 जणांची सुखरुप सुटका केली. मुलं नेमकी कशी पोहोचली? (Mumbai Children Hostage) शाळेमधून मुलांना ऑडिशन देण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आली होती.
मधून सुद्धा मुलं ऑडिशन देण्यासाठी आली होती. या सर्व मुलांची रोहित आर्याने सकाळी ऑडिशन घेतली. यानंतर लहान मुलांना खुश करण्यासाठी रोहित आर्याने पिझ्झा आणि कोल्ड्रिंकसोबत इतर खाण्याच्या वस्तू मागवल्या. ऑडिशन झाल्यानंतर त्याने सर्व मुलांना बंधक बनवण्यास सुरुवात केली. लहान मुलांच्या डोक्यावर बंदूक ठेवून कोणी बोलू नका, नाही तर गोळी मारेन अशी धमकी आरोपी रोहित आर्या देत राहिला.
पालकांना केव्हा शंका आली? लंच टाईममध्ये मुलं स्टुडिओतून बाहेर न आल्याने पालक चिंतेत पडले. मुलांनी काचेतून हात दाखवल्यानंतर पोलिस आले आणि हे अपहरणाचे प्रकरण असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेत नेमकं काय घडलं? (Mumbai Children Hostage) मुलांना आमिष दाखवून बंदी बनवण्यात आले. ही घटना पवई परिसरातील आरए स्टुडिओमध्ये घडली. मुले सह विविध ठिकाणांहून आली होती.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने एक व्हिडिओ संदेश जारी केला. सर्व मुलांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले. पोलिस बाथरूममधून खोलीत घुसले. खोलीत एअरगन आणि केमिकल देखील आढळलं.
आरोपीने एक व्हिडिओ जारी केला दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की त्यांनी आरोपीला यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी पोहोचली. मुलांना ओलीस ठेवल्यानंतर आरोपीने एक व्हिडिओ देखील जारी केला. त्यात तो म्हणाला की, "मी रोहित आर्य आहे. आत्महत्या करण्याऐवजी, मी एक योजना आखली आणि काही मुलांना ओलीस ठेवले.
माझ्या फारशा मागण्या नाहीत. माझ्या काही साध्या मागण्या आहेत. माझे काही प्रश्न आहेत. मी दहशतवादी नाही आणि मी मोठ्या रकमेची मागणी करत नाही. मी या मुलांना साध्या संभाषणासाठी ओलीस ठेवले आहे.
" व्हिडिओ संदेशात, आरोपी पुढे म्हणतो, "मी एकटा नाही. माझ्यासोबत अनेक लोक आहेत. मी बोलून तोडगा काढेन. " आरोपी एकटा होता, पोलिसांनी दिली माहिती पोलिसांनी सांगितले की दुपारी 1:45 वाजता मुलांना ओलिस ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला एका बाजूने बोलण्यात गुंतवून दुसऱ्या बाजूने बाथरुममधून पोलिसांनी आत एन्ट्री करत ओलिस ठेवलेल्या मुलांची सुटका केली.
यावेळी घटनास्थळी एअरगन आणि केमिकल दिसून आले. आरोपी एकटाच होता. आम्ही कारण शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपी त्याच्या मागण्यांवर ठाम राहिला. इतर महत्वाच्या बातम्या.







