Mumbai Hostage Case :घडली आहे. रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने 17 मुलांसह दोन ज्येष्ठ नागरिकांना किडनॅप केलं होतं. मुलांना डांबून ठेवण्याऱ्या रोहित आर्याने एक व्हिडीओ जारीकरुन आग लावून देण्याची धमकी देखील दिली होती. पवईतील रा स्टुडीओमध्ये ही घटना घडली आहे. दरम्यान, पोलीस आणि अग्निशामक दलाच्या मदतीने आरोपी रोहित आर्याला अटक करण्यात आली आहे.
तसेच डांबून ठेवलेल्या मुलांची सुटका करण्यात आली आहे. दुपारी दोन वाजता पोलिसांना कॉल आणि ऑपरेशन सुरु रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने 17 मुलांसह दोन ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे एकूण 19 जणांना किडनॅप केलं होतं. या घटनेनंतर दुपारी दोन वाजता याबाबत पोलिसांना कॉल आला होता. यानंतर पोलिसांनी ऑपरेशन सुरू केलं होतं. तत्पूर्वी आरोपी रोहित आर्या ने एक व्हिडीओ देखील जारी केला होता.
यामध्ये त्याने विविध मागण्या करत आग लावून देण्याची धमकी देखील दिली होती. यानंतर पोलीस आणि अग्निशामक दलानं ऑपरेशन सुरु केले होते. त्यानंतर आरोपी रोहित आर्याला अटक करण्यात आली आहे. एअर गन घेऊन आरोपी रोहित आर्याने सर्वांना किडनॅप केलं होतं. व्हिडीओमध्ये नेमकं काय काय म्हणाला रोहित आर्य? रोहित आर्य हा मानसिक रुग्ण असल्याची देखील माहिती मिळत आहे.
या व्यक्तीने मुलांना नेमकं का डांबून ठेवलं याबाबतची माहिती व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. पवईतील रा स्टुडीओमध्ये ही घटना घडली आहे. मुलांना या ठिकाणी ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. आत्महत्या करण्याऐवजीमी एक प्लॅन बनवला होता. माझ्या काही मोठ्या मागण्या नाहीत.
माझ्या छोट्या मागण्या आहेत. माझे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची मला उत्तरे हवी आहे. यापलीकड़े मला काहीच नको आहे. मी दहशतवादी नाही.
माझी कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी नाही. मला संवाद साधायचा आहे. ज्यामुळं मी या मुलांना ओलीस ठेवलं आहे. मी प्लॅन करुनच या मुलांना ओलीस ठेवलं आहे. मी हे करणारच होतो.
मी जिवतं राहिलो तर करेल नाहीतर मरेल अशी माहिती रोहत आर्य या व्यक्तीने व्हिडीओ बनवून दिली आहे. या ठिकाणी आग लावून देण्याची धमकी देखील त्याने दिली आहे. माझं बोलणं झाल्यानंतर मी स्वत: बाहेर येणार आहे. मी एकटा नाही तर माझ्या बरोबर खूप सारे लोक आहेत. अनेकांना खूप अडचणी आहेत.







