मोठी बातमी : मुंबईत 20-22 मुलांना ओलीस ठेवलं; किडनॅपर रोहित आर्यचा व्हिडिओ, मोठ-मोठ्या डिमांड

मोठी बातमी : मुंबईत 20-22 मुलांना ओलीस ठेवलं; किडनॅपर रोहित आर्यचा व्हिडिओ, मोठ-मोठ्या डिमांड
By : | Updated at : 30 Oct 2025 05:45 PM (IST)

मुंबई : राजधानी पवईत एका व्यक्तीने अनेक मुलांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओलीस ठेवण्यात आलेली सर्व मुले 15 वर्षांखालील असून 17 मुला-मुलींना एका खोलीत बंद करुन ठेवण्यात आले होते. या मुलांसह 2 पालकही खोलीत बंद होते. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि NSG कमांडो पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दल आणि मदतीने अखेर ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत मुलांची सुटका करण्यात आली.

यावेळी, आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली असून पोलिसांच्या चकमकीत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सध्या शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने पालक आपल्या मुलांना वेगवेगळ्या कोर्सेसला किंवा इतर अॅक्टीव्हीसाठी गुंतवून ठेवत आहेत. त्यातच, मुंबईच्या पवई येथील RA स्टुडिओत काही शाळकरी मुले गेल्या 4-5 दिवसांपासून प्रशिक्षणसाठी येत होती. मात्र, ऑडिशनच्या नावाखाली येथील स्टुडिओत किडनॅपरने शाळकरी मुलांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. या घटनेनं मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. ऑडिशनसाठी आलेल्या मुलांना दुपारी 2 वाजताच्या सुमारास जेवणासाठी सोडण्यात आल्यानंतर रोहित आर्य या व्यक्तीने मुलांना एका खोलीत कोंडून ओलीस ठेवले. रोहित आर्यचा व्हिडिओतून संवाद (Rohit arya video) रोहित आर्य (Rohit Arya) असं मुलांना ओलीस ठेवलेल्या आरोपीचं नाव असून माझ्या काही मागण्या आहेत. मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना बंदी बनवलं आहे, असं रोहित आर्यने व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं आहे. मी दहशतवादी नाही, माझ्या काही साध्या मागण्या आहेत.

मला संवाद साधायचा आहे, काही बोलायचं आहे, मला काही लोकांशी बोलायचं आहे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत असं रोहित आर्यने म्हटलं आहे. कोण आहे रोहित आर्य (Rohit arya education project loss) मी दहशतवादी नाही. माझी पैशाची मागणी केलेली नाही. अनेक प्रयत्न झाले. अनेकांना अनेकवेळा भेटून झाले.

1 मे पासून साधे उपोषण करून देखील अजून आज/उद्या असेच होत आहे. त्यामुळे, आजपासून मी तीव्र उपोषण सुरु केले. आता, पाणी सुद्धा घेणार नाही. गांभीर्य समजून घेतले तर बरे होईल, नाही समजले तर जय श्री राम असं रोहित आर्यने (Rohit Arya) म्हटलं. मी एकटा नाही, अनेक लोकांना हा प्रश्न आहे, त्याच सोल्युशनसाठी मला संवाद साधायचा आहे, असंही ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यने म्हटलं.

दरम्यान, एका प्रकल्पात आर्थिक नुकसान झाल्यामुळे रोहितने संबंधित विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. आर्य हा मागील काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसला होता, त्याचे पैसे सरकारकडे आहेत. शिक्षण विभागासाठी त्याने स्वच्छता मॉनिटरचा एक प्रोजेक्ट लोन काढून केला होता, त्याचे पैसे त्याला मिळाले नाहीत आणि कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं त्याचं म्हणणं आहे. पोलीस आतमध्ये कसं घुसले (Police told about powai kidapping) पावणे दोन वाजताच्या सुमारास पोलिसांना कॉल आला, ज्यामध्ये माहिती दिली की एका व्यक्तीने महावीर क्लासिक नावाची बिल्डिंग आहे तिथे लहान मुलांना बंधक बनवून ठेवलं आहे. पोलिसांनी तात्काळ कॉलला प्रतिसाद देऊन इथे स्पेशल युनिट्स आणि क्विक अॅक्शन फोर्स बोलवली.

ज्या व्यक्तीने बंधक बनवलं होतं, त्याच्याशी संवाद आणि वाटाघाटी पोलिसांनी केल्या. त्यानंतर आमच्या पवई पोलिस अधिकाऱ्यांनी बाथरुममधून एन्ट्री करुन आतील एका व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांची सुखरुप सुटका केली. एकूण 17 मुलं, एक वयस्कर आणि एक स्थानिक असे 19 लोक आतमध्ये होते. रोहित आर्य असं आरोपीचं नाव आहे. रोहितकडे एक बंदूक होती, पण अधिक तपास सुरु आहे.

आरोपीचं बॅकग्राऊंड किंवा त्याच्या मागण्या काय होत्या याचा तपास सुरु आहे. एका वेब सीरिज ऑडिशन घ्यायचं म्हणून या मुलांना बोलवण्यात आलं होतं. त्यासाठी या सोसायटीचा हॉल घेतला होता. जी मुलं ऑडिशनसाठी आली होती, त्यांनाच त्याने बंधक बनवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली. आतमध्ये नेमके किती लोक होते, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं? (Powai kidnappig witness story) साधारण 20 मुलांना बंधक बनवलं गेलं होतं.

रोहित आर्या नावाचा व्यक्तीने बंदूक घेऊन सर्वांना बंधक बनवला होता. पवई पोलीस आणि डीसीपींनी तात्काळ ऑपरेशन राबवत सर्वांना रेस्क्यू केला आहे. सकाळी शूटिंग करण्यासाठी 25 ते 30 मुलं वेगवेगळ्या जिल्ह्यामधून या ठिकाणी आले होते. शूटिंग झाली यानंतर दुपारी या सर्व मुलांना बंदूकचा धाक दाखवून किडनॅप केला गेला. किडनॅपर मुलांना किडनॅप करून मागणी करत होता.

पोलिसांनी वेळेत सर्व मुलांना रेस्क्यू केला आहे. किडनॅपर बंदूक घेऊन आतमध्ये बसला होता. बंदूक घेऊन कसा आतमध्ये पोहोचला, यामध्ये सुरक्षा मोठी चूक झाली आहे. त्यामुळे कठोर कारवाई करावी असे मागणी प्रत्यक्षदर्शी यांनी केली आहे. मुलांची सुटका, पोलीस स्टेशलना स्टेटमेंट नोंद (Mumbai powai kidnapping case) दरम्यान, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून आरोपी माथेफिरू रोहित आर्यला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सूरू आहे.

मात्र, या घटनेनं राजधानी त चांगलीच खळबळ उडाली होती. सुदैवाने सर्व मुले सुखरुप आहेत, पण ते घाबरलेले आहेत असे पालकांकडून सांगण्यात येत आहे. रोहितने ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका केल्यानंतर मुलांना आणि त्यांच्या पालकांना स्कूल बसमधून पवई पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहेत. पोलीस स्टेशनमध्ये मुलांसह पालकांचे स्टेटमेंट घेतलं जाईल आणि त्यानंतर त्यांना सोडतील, अशी माहिती आहे. किडनॅप प्रकरणात दोघे जखमी (Women injured powai kidnap case) पवई स्टुडिओमध्ये 17 मुलांना किडनॅप प्रकरणात दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे.

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान एक सिनिअर सिटीझन महिला आणि लहान मुलगी जखमी झाली आहे. जखमीना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार शिवाजी सावंत यांनी महिलेला सुखरूप वाचवल्याची माहिती संबंधित महिलेकडून देण्यात आली. पोलिसांच्या गोळीने आरोपी रोहित आर्याचा मृत्यू पवई स्टुडिओ ऑडिशन किडनॅपिंग केस प्रकरणातील आरोपी रोहित आर्या याने पोलिसांवर गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी क्रॉस गोळीबार करत एक राउंडही फायर केला होता.

या गोळीबारात आरोपी रोहित आर्या जखमी झाला, उपचारादरम्यान आरोपी रोहित आर्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजप अध्यक्षांकडून पोलिसांचे अभिनंदन मुंबई पोलिसांचे अभिनंदन, पोलिसांनी मुलांना रेस्कू केलं आहे. गुन्हा घडायच्या आधीच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. त्यामुळे, वेळीच मोठा अनर्थ टळला, पोलिसांनी जागृकता दाखवल्याने मोठा गुन्हा टळला, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी पवई किडनॅप प्रकरणावर बोलताना म्हटले. तसेच, सोसायटीने आपला हॉल देताना नोंद ठेवली पाहिजे, पालकांनी देखील भ्रमीत करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये आणि जागृकता दाखवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सूचवले.

📚 Related News