ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताकडून टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याला प्लेइंग 11 मध्ये स्थान (Ind vs Aus 1st T20 Playing XI) देण्यात आले नाही. अर्शदीपने टी-20 मध्ये भारतासाठी 101 विकेट्स घेतल्या आहेत. तर एकदिवसीय मालिकेत फलंदाजीतही चांगली कामगिरी केल्यामुळे हर्षित राणाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळवण्यात आले आहे. जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि रिंकू सिंग यांनाही प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात आले नाही. शिवाय, दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी पहिल्या तीन टी-20 सामन्यांमधून बाहेर पडला.
भारताने तीन फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवले- (Ind vs Aus 1st T20 Playing XI) भारतीय संघाने पहिल्या टी-20 सामन्यात तीन फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवले. या सामन्यात वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल हे सर्वजण खेळत आहेत. हे तिघेही दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. पहिल्या टी-20 साठी भारत-ऑस्ट्रेलियाचा संघ- (Ind vs Aus 1st T20) भारतीय संघ- (Team India) अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह. ऑस्ट्रेलियाचा संघ- (Team Australia) मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टॉयनिस, जोश फिलिप, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन आणि जोश हेझलवुड.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेचे वेळापत्रक- (Ind vs Aus T20 Schedule) पहिला टी20 :29 ऑक्टोबर – मनुका ओव्हल, कॅनबेरादुसरा टी20 :31 ऑक्टोबर – मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्नतिसरा टी20 :2 नोव्हेंबर – ब्लंडस्टोन अरेना, होबार्टचौथा टी20 :6 नोव्हेंबर – गोल्ड कोस्टपाचवा टी20 : 8 नोव्हेंबर – ब्रिस्बेन.







