Ind vs Aus 1st T20 : टीम इंडियाला धक्का; अष्टपैलू खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांमधून बाहेर, पाहा भारताची Playing XI

Ind vs Aus 1st T20 : टीम इंडियाला धक्का; अष्टपैलू खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांमधून बाहेर, पाहा भारताची Playing XI
By : | Updated at : 29 Oct 2025 01:45 PM (IST)

Australia vs India, 1st T20I Update :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना बुधवारी, 29 ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने नितीश कुमार रेड्डीबाबत अपडेट दिली आहे. नितीश कुमार रेड्डीबाबत BCCI ने दिली अपडेट नितीश कुमार रेड्डीला पहिल्या तीन टी-20 सामन्यांतून वगळण्यात आले आहे.

अ‍ॅडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डाव्या मांडीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीतून तो सावरत होता. मात्र, त्याला आता नेक स्पॅझम्सची तक्रार जाणवली आहे, ज्यामुळे त्याच्या पुनर्वसन आणि हालचालींवर परिणाम झाला आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम सध्या त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवत आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला? पहिल्या टी-20 सामन्यासाठी संघ निवडीबाबत कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेकीदरम्यान सांगितले की, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग आणि नितीश कुमार रेड्डी या सामन्यात खेळत नाहीत. पण, त्याने नितीशच्या दुखापतीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ निवडण्यात आला होता, त्यापैकी 11 खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत आणि 5 खेळाडू बेंचवर बसतील. अर्शदीप सिंग सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे, परंतु तो देखील संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नाही. भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन :अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (विकेटकीपर), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह. ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग इलेव्हन : मिशेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टिम डेव्हिड, मिशेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, जोश फिलिप, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवूड.

📚 Related News