International Internet Day : जागतिक इंटरनेट दिवस! जग इंटरनेटवर झेप घेत असताना... काही देश आजही ऑफलाइन!

International Internet Day : जागतिक इंटरनेट दिवस! जग इंटरनेटवर झेप घेत असताना... काही देश आजही ऑफलाइन!
By : | Updated at : 29 Oct 2025 05:42 PM (IST)

International Internet Day : 29 ऑक्टोबर 1969 अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाममध्ये कॉम्प्युटर ते कॉम्प्युटर मेसेज पाठवण्याचा प्रयोग यशस्वी झाला. आणि इथूनच पुढे एका नव्या युगाची सुरुवात सुरु झाली. ती म्हणजे इंटरनेट युग. आज अख्खं जग इंटरनेटशी जोडलं गेलंय. माहिती, व्यवसाय, शिक्षण, दळणवळण आणि इतर असंख्य गोष्टी इंटरनेटशी जोडल्या गेल्यायत.

अन्न, वस्त्र, निवारा यासह इंटरनेटही आजची मूलभूत गरज बनली आहे, पण एक इंटरेस्टिंग गोष्ट ही की आज जगात असे काही देश आहेत जिथे इंटरनेट वापरावर बंदी आहेत. तर काही ठिकाणी कठोर निर्बंध आहेत. तर काही देशात सर्वसामान्य जनतेला इंटरनेट अक्सेसच नाही. उत्तर कोरिया उत्तर कोरिया हा जगापासून जवळपास डिस्कनेक्ट असलेला हा देश. इथे सामान्य नागरिकांसाठी इंटरनेट पूर्णपणे बंद आहे.

त्यांना फक्त "क्वांगम्याँग" नावाचं स्थानिक नेटवर्क वापरता येतं. जे सरकारनं तयार केलंय आणि पूर्णपणे सरकारच्याच नियंत्रणात आहे. उत्तर कोरियात फेसबुक, यूट्यूब अजूनही पोहोचलेलं नाही, महत्वाचं म्हणजे उत्तर कोरियातून कुणी बाहेरच्या नेटवर्कशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला. तर जबर शिक्षाही भोगावी लागते. इथे फक्त उच्च श्रेणीतील परदेशातील अधिकाऱ्यांनाच ग्लोबल नेटवर्कशी कनेक्ट होता येतं.

मात्र हुकुमशाह किम जोंग उनच्या सरकारची या सगळ्यावर नजर असते. तुर्कमेनिस्तान इंटरनेटवर निर्बंध असलेला आणखी एक देश आहे तुर्कमेनिस्तान आहे. मध्य आशियातल्या या देशात इंटरनेटवर सरकारचं संपूर्ण नियंत्रण आहे. फक्त सरकारी सोर्सकडून मिळणाऱ्या इंटरनेटमधूनच लोक जगाशी जोडले जातात. पण इथेही फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप आणि यूट्यूब सगळं बंद आहे.

तुर्कमेनिस्तानमध्ये सरकारविरोधी मत मांडणं म्हणजे भयंकर गुन्हाच आहे. इराण इराणमध्ये इंटरनेटवर पूर्णपणे बंदी नाही, पण ते कठोर नियंत्रणाखाली आहे. इराण सरकार “National Information Network” नावाचं स्वतंत्र इंटरनेट वापरते. पण प्रचंड अराजकता असलेल्या या देशात आंदोलनं झाली की लगेच इंटरनेट बंद केलं जातं. फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, टेलिग्राम हे सगळं इथं ब्लॉक आहे.

लोक VPN म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरुन सोशल मीडिया वापरतात. पण पकडले गेले तर भयंकर शिक्षा मिळते. चीन जागतिक व्यापारात अग्रेसर असणाऱ्या चीनमध्ये इंटरनेटच्या वापरावर मात्र प्रचंड मर्यादा आहेत. चीनमध्ये इंटरनेट आहे, पण वापरण्यास हवं तसं स्वातंत्र्य नाही. इथे “The Great Firewall of China” नावाची मोठी सिस्टीम आहे.

ही सिस्टिम जगातल्या बहुतेक वेबसाइट्स ब्लॉक करते. त्यामुळे चीनमध्ये Facebook, Instagram सह अनेक सोशल मीडिया साईट्स बंद आहेत. त्याऐवजी लोक WeChat, Weibo, Baidu सारखी अॅप्स वापरतात. जी संपूर्णपणे सरकारच्या देखरेखीखाली आहेत. क्यूबा क्यूबामध्ये काही वर्षांपूर्वी इंटरनेट फक्त हॉटेल्स आणि सरकारी ऑफिसेसमध्येच उपलब्ध होतं.

आता काही सार्वजनिक ठिकाणी वायफाय झोन आहेत, पण सगळं काही मॉनिटर केलं जातं. VPN वापरणं इथे गुन्हा आहे. आज जग बरंच पुढे गेलंय. विज्ञान तंत्रज्ञानानं अवकाशाच्या पलिकडेही झेप घेतलीये आणि त्यात इंटरनेट हा महत्वाचा दुवा ठरलंय. त्यामुळे देश कुठलाही असो, इंटरनेटवर बंदी म्हणजे मानवी स्वातंत्र्यावर एकप्रकारचं बंधनच.

📚 Related News