रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये पुन्हा जुंपली, तटकरे कुटुंबांनी थेट शिवसेनेचा कार्यक्रमच थांबवला

रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये पुन्हा जुंपली, तटकरे कुटुंबांनी थेट शिवसेनेचा कार्यक्रमच थांबवला
By : | Updated at : 29 Oct 2025 05:29 PM (IST)

Raigad News : रायगडमध्ये (Raigad) शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. तटकरे कुटुंबांनी थेट शिवसेनेचा लोककल्याणकारी कार्यक्रमच थांबवला आहे. यामुळं शेकडो लाभार्थ्यांवर घरी लाभवीना जाण्याची वेळआली आहे. बॅनरवर तटकरे कुटुंबाचा फोटो नसल्याने कार्यक्रमावर आक्षेप घेतल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. निवडणुकीत त्यांची जागा आम्ही दाखवू असे म्हणत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंना आव्हान दिलं आहे.

रायगड मध्ये तटकरे विरुद्ध गोगावले असा सामना पुन्हा रंगण्याची शक्यता शासनाच्या लोककल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी शिंदे शिवसेनेकडून शिवसेना आपल्या दारी हा उपक्रम सध्या रायगडमध्ये सुरू आहे. मात्र, या उपक्रमावर थेट अजित दादांच्या राष्ट्रवादीने आक्षेप घेतल्याचा आरोप शिंदे सेनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे उपक्रमांतर्गत छापण्यात आलेल्या बॅनरवर तटकरे कुटुंबाचा फोटो नसल्याने हा राग सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांना आल्याने त्यांनीच हा कार्यक्रम अधिकाऱ्यांना दमदाटी करून थांबण्यास भाग पाडल्याचा आरोप देखील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केला आहे. शिवाय आगामी काळातील निवडणुकीत आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा सुधा शिवसैनिकांनी आणि लाभार्थ्यांनी तटकरेंना दिलाय.

त्यामुळे मध्ये तटकरे विरुद्ध गोगावले असा सामना पुन्हा रंगण्याची शक्यता आहे. c.

📚 Related News