बीडच्या आकापेक्षा मोठा आका फलटणमध्ये, आकाचा आका महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, सपकाळांचा जोरदार प्रहार

बीडच्या आकापेक्षा मोठा आका फलटणमध्ये, आकाचा आका महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, सपकाळांचा जोरदार प्रहार
By : | Updated at : 29 Oct 2025 06:25 PM (IST)

Harshvardhan Sapkal : बीडच्या आकापेक्षा मोठा आका फलटणमध्ये लपला आहे. या आकाचा मोठा आका महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी टीका केली. हगवणे प्रकरणांमध्ये अडचणीत येत असताना मृत मुलीवरती आरोप केले गेले तसेच आरोप डॉक्टर संपदा मुंडे संदर्भात केले जात आहेत. डॉ. संपदावर दबाव होता तो फलटण जिल्ह्यातील आका चा होता असा आरोप देखील सपकाळ यांनी केला आहे.

बीडच्या आकापेक्षा मोठा आका फलटणमध्ये लपला च्या आकापेक्षा मोठा आका फलटणमध्ये लपला आहे. या आकाचा मोठा आका महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्याची टीका सपकाळ यांनी केली आहे आणि हा मुख्यमंत्री जाऊन त्याला क्लीन चीट देतो. ही ाच्या पुरोगामित्वला लाज वाटणारी घटना आहे. डॉ. संपदाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्यांना आया बहिणी नाहीत का ? असा सवाल करत सपकाळ यांनी जोरदार टीका केली.

सरकारच्या विरोधात जनतेत मोठा असंतोष सरकारच्या विरोधात जनतेत मोठा असंतोष निर्माण झाला आहे. सरकारनं कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. मात्र, अद्यापही सरकारने कर्जमाफी केली नसल्याचे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. आम्ही शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये देण्याची मागणी केली होती. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय घेतला आहे.

सध्या जनतेचा उद्रेक होताना दिसत आहे. फडणवीस हे चोमू मुख्यमंत्री आहेत. ते मत चोरुन मुख्यमंत्री झाल्याची टीका यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पिकाबरोबर जमिनी देखील वाहून गेल्या आहेत.

या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तुटपुंजी मदत केल्याचा आरोप करण्यात येत आहे. चअनेक शेतकऱ्यांना अद्याप मदत देखील मिळाली नाही. तसेच कर्जमाफीचे आ्सानसन सरकारने दिले होते. अद्याप देखील सरकारनं याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं राज्यातील शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत.

📚 Related News