: जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा काँग्रेस पक्षाकडून आमदार राहिलेले दिलीप सानंदा यांनी अलीकडेच अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यामुळे, ते राष्ट्रवादीमय व महायुतीमय झाले आहेत. मात्र, अद्यापही ते काँग्रेसचे गुणगान गाताना दिसत आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, त्यांनी थेट प्रमुख भाजपलाच आव्हान दिलं आहे.
माजी आमदार दिलीप सानंदा यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमात चांगलाच व्हायरल होत असून यात ते काही मुस्लिम मित्रांना मी भाजपासोबत कधीच निवडणुकीसाठी बसणार नाही व आगामी निवडणुकीत एक वेळ राष्ट्रवादीच्या उमेदवाराला माघार घेऊन काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणू असं सांगताना या व्हिडिओत ते दिसत आहेत. याव्यतिरिक्त मी काय पागल आहे का काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत जाईल. मात्र, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे खूप श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे हेलिकॉप्टर आहेत. सर्व एस पी, कलेक्टर त्यांच्या अंडरमध्ये आहेत. त्यांना 500 कोटी रुपये डीपीडीसीतून खर्च करण्याची लिमिट आहे, असेही बोलताना ते दिसत आहेत.
त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बुलढाण्यातील खामगाव मतदारसंघात महायुतीत आतापासूनच चांगलीच जुपल्याच चित्र दिसत आहे. व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण दरम्यान, याबाबत दिलीप सानंदा यांच्याशी संपर्क करून वायरल व्हिडिओबद्दल विचारले असता त्यांनी हा व्हिडिओ फेक असून यात फेक नेरेटीव्ह असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, हा व्हिडिओ माझा नसल्याचही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, व्हिडीओतील गूढ वाढलं आहे. दरम्यान, राज्यात आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. तर, महायुतीमधील घटक पक्ष काही जिल्ह्यातील स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे, आगामी निवडणुकांमध्ये महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र हाच खरा प्रश्न आहे. हेही वाचा.








