Gautami Patil Abhijeet Sawant: इंडियन ऑयडॉलच्या (Indian Idol) पहिल्या पर्वाचा विजेता गायक अभिजीत सावंतनं (Abhijeet Sawant) नुकतीच संगीत विश्वातली आपली 20 वर्ष पूर्ण केली आहेत. गेल्याच वर्षी तो बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वात दिसलेला. तेव्हापासून अभिजीतच्या फॅनफॉलोइंगमध्ये मोठी वाढ झालीय. तो सातत्यानं नवनवे प्रोजेक्ट करताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी त्यानं अल्बम्स रिलीज केलेत, ज्याला चाहत्यांची मोठी प्रसिद्धी मिळालेली.
अशातच आता अभिजीत सावंत, सबसे कातील गौतमी पाटीलसोबत (Gautami Patil) दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत असणारी नृत्यांगणा गौतमी पाटील महाराष्ट्रभरात स्टेज शो करत असते. याव्यतिरिक्त तिनं काही सिनेमांमध्येही काम केलंय. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या 'प्रेमाची गोष्ट 2' सिनेमात गौतमी पाटीलचं आयटम सॉन्ग होतं. अशातच आता स्टेज शो, आयटम सॉन्ग करणारी गौतमी पाटील थेट 'इंडियन आयडॉल' फेम अभिजीत सावंतसोबत नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
यासाठी कारण ठरलीय, गौतमी पाटीलची इन्स्टाग्राम पोस्ट. गौतमीची इन्स्टा पोस्ट चर्चेत. गौतमी पाटीलनं सोशल मीडियावर गायक अभिजीत सावंतसोबतचा फोटो शेअर केलाय. तसेच, त्या फोटोला 'NEW' असं कॅप्शन दिलं आहे. अशातच आता दोघेही सोबत काम करणार का? नवी प्रोजेक्टवर काम करतायत का? की आणखी काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे, अशा चर्चा रंगल्या आहेत.
हसतानाच्या इमोजीसह पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये गौतमी पाटील आणि अभिजीत सावंत खळखळून हसताना दिसत आहेत. 'इंडियन आयडॉल' फेम अभिजीत सावंतनं गेल्या अनेक दिवसात अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आणली. त्यात 'प्रेमरंग सनेडो', 'चाल तुरू तुरू' यांसारख्या गाण्यांना जबरदस्त व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. त्यापूर्वी अभिजीत Bigg Boss Marathi Season 5 मुळे चर्चेत आलेला. त्यावेळी अवघ्या ानं त्याला पाठींबा दिलेला.
तसेच, 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्येही अभिजीत झळकला होता. तर, गौतमी पाटीलबाबत सांगायचं झालं तर, अलिकडेच रिलीज झालेल्या 'प्रेमाची गोष्ट 2'मधील 'दिसला गं बाई दिसला 2. 0' गाण्यात गौतमी पाटील दिसलेली. या गाण्यावरुन तिला ट्रोल करण्यात आलेलं. तसेच, 'सोनचाफा', 'आई गोंधळाला ये' अशा म्युझिक अल्बम्समध्येही ती झळकलेली.







