Sudhir Dalvi Critical Family Appeals For Financial Help:'शिरडी के साईं बाबा' (Shirdi Ke Sai Baba) फेम दिग्गज अभिनेते सुधीर दळवी (Sudhir Dalvi) यांची प्रकृती गंभीर असून त्यांना च्या लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आलं आहे. सुधीर दळवी सध्या इन्फेक्शनच्या समस्येनं त्रस्त आहेत. त्यांना सेप्सिससारखं जीवघेणं इन्फेक्शन (Sepsis Infection) झालं असून ते सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. अशातच आता सर्वात दुःखद बाब म्हणजे, त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या उपचाराना लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी आवाहन करावं लागतंय. 1977 मध्ये आलेल्या 'शिरडी के साईं बाबा'मध्ये सुधीर दळवी यांनी साई बाबांची भूमिका साकारलेली.
त्या काळात त्यांना खूप मोठी प्रसिद्धी मिळालेली. अनेकजण त्यांनाच खरेखुरे साईबाबत समजू लागलेले. सध्या ते 86 वर्षांचे असून त्यांना सेप्टिक इंफेक्शन झालंय. सेप्टिक इंफेक्शनशी लढतायत सुधीर दळवी, वाढता खर्च अवाक्याबाहेर 'टेली चक्कर'नं दिलेल्या माहितीनुसार, सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी सध्या 10 लाख रुपयांहून अधिक खर्च झालाय. त्यांचं कुटुंब आर्थिकरित्या पूर्णपणे कोलमडलंय.
त्यांच्या उपचारासाठी अजून 15 लाख रुपयांची गरज आहे. त्यासाठी कुटुंबीयांनी आता फिल्म इंडस्ट्रीसोबत सुधीर दळवींच्या चाहत्यांकडे मदतीचं आवाहन केलंय. सुधीर दळवी यांचं करिअर, रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्येही साकारलेली भूमिका सुधीर दळवी यांच्या इंडस्ट्रीतल्या करिअर आणि सिनेमांबाबत बोलायचं झालं तर, त्यांनी अनेक फिल्म्स आणि टेलिव्हिजन सीरिअल्समध्ये काम केलंय. कित्येक दशकांपूर्वी त्यांनी एका फिल्ममध्ये शिर्डीच्या साईबाबांची भूमिका साकारलेली. ज्यासाठी त्यांना आजही ओळखलं जातं.
सुधीर दळवी यांनी रामानंद सागर यांची सीरिअल 'रामायण'मध्येही काम केलेलं. ते त्यामध्ये ऋषि वशिष्ठच्या रोलमध्ये दिसलेले. सुधीर दळवी 2003 मध्येही पडद्यावर दिसलेले. त्यांनी 'वो हुए ना हमारे', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'जय हनुमान', 'विष्णु पुराण', 'बुनियाद' आणि 'जुनून' सारखे टेलिव्हिजन शो केलेले. सुधीर दळवींच्या मदतीला धावली रिद्धिमा कपूर, पण होतेय ट्रोल.
का? बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते ऋषि कपूर यांची लेक रिद्धिमा कपूर साहनी हिनं सुधीर दळवींना मदतीचा हात देऊ केला आहे. पण, तिला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. रिद्धिमा कपूरनं अभिनेत्यासाठी जमा करण्यात येणाऱ्या वैद्यकीय निधीत योगदान दिल्याचं जाहीर केलंय. त्यासंदर्भात तिनं एक कमेंट केलीय. म्हणूनच ती ट्रोल होतेय.
इन्स्टाग्रामवरील Viral Bhayani च्या पोस्टवर कमेंट करत रिद्धिमानं आर्थिक मदत पाठवल्याचं म्हटलंय, शिवाय तिनं सुधीर यांना लवकरात लवकर बरं वाटावं याकरता प्रार्थनाही केली आहे. यामुळे ती ट्रोल होतेय. महत्त्वाच्या इतर बातम्या :.







