'माशल्ला क्या दुधिया बदन .. ' तमन्ना भाटियावर अश्लील कमेंट, अनु कपूर वादाच्या भोवऱ्यात, चाहतेही चक्रावले

'माशल्ला क्या दुधिया बदन .. ' तमन्ना भाटियावर अश्लील कमेंट, अनु कपूर वादाच्या भोवऱ्यात, चाहतेही चक्रावले
By : | Updated at : 30 Oct 2025 05:07 PM (IST)

Annu Kapoor on Tamanna Bhatia: बॉलीवूडमधील अनेक चित्रपट आणि कार्यक्रमांमध्ये सहकलाकार किंवा होस्ट म्हणून दिसलेले अभिनेते अनु कपूर यांचं एक वादग्रस्त वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. एका पोडकास्ट मध्ये त्यांना अभिनेत्री तमन्ना भाटिया विषयी विचारलं गेलं तर तेव्हा तिच्या शरीरावरून दिलेल्या कमेंटमुळे अभिनेते अनु कपूर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. अनेकांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केलीय. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या अनु कपूर यांच्या तोंडून असे शब्द बाहेर पडल्याचं पाहून चाहत्यांना धक्का बसलाय. (Annu Kapoor Comment on Tamanna Bhatia) शुभंकर मिश्राच्या पॉडकास्ट शोमध्ये अनु कपूर यांनी त्यांच्या लव्ह स्टोरी, करिअरसह अनेक प्रसंगांवर संवाद साधला.

यावेळी पॉडकास्ट चे होस्ट शुभंकर मिश्रा यांनी तुम्हाला तमन्ना भाटिया आवडते का असा प्रश्न विचारला, त्यावेळी 'माशाल्ला ! वाह वाह. क्या दुधिया बदन है ! ' असं म्हणताना ते दिसतात. याच वक्तव्यावरून सध्या अभिनेत्यांना कपूर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नेमकं काय म्हणाले अनु कपूर ? अनु कपूर यांनी तमन्ना भाटियाचा आज की रात गाण्यावर ही कमेंट केली आहे. या कमेंटवर शुभंकर मिश्रा सांगतो की तमन्ना नाही तिच्या एका इंटरव्यू मध्ये सांगितलं होतं की आई आपल्या मुलांना झोपवण्यासाठी हे गाणं लावते.

आणि ते गाणं ऐकून मुलं झोपून जातात. यावर खिल्ली उडवताना अनु कपूर म्हणतात, झोपणाऱ्या मुलाचं वय नक्की किती असतं ? सत्तर वर्षांची मुलं ही झोपू शकतात. मी 70 वर्षांचा मुल आहे. कुणी अकरा वर्षांचा म्हाताराही असू शकतो. मग झोपताय कोण ? जर मी असलो असलो तर नक्की विचारलं असतं किती वर्षांचे मुलं हे गाणं ऐकून झोपून जातात.

इंग्रजीत असं म्हटलं जातं ' he is 70 years old' मे 70 साल पुराना बच्चा हू. 'he is 11 years old बुढ्ढा !. त्यामुळे कोण झोपून जातं ? चांगली गोष्ट आहे. जर 'बहन तमन्ना ' आपल्या तमन्ना भाटिया आपल्या गाण्याने, आपल्या शरीराने, आपल्या 'दुधीया चेहेरेसे ' जर आपल्या मुलांना झोपवत असेल तर चांगली गोष्ट आहे. आपल्या संपूर्ण देशावर कृपा झाली.

की आपल्या देशातील मुलं स्वस्थ आणि शांत झोप घेतील. अजूनही तिची काही अशी इच्छा असेल तर देवाने तिला सामर्थ्य द्यावं कितीचा इच्छा पूर्ण होऊ शकतील एवढाच माझा आशीर्वाद आहे" असं अनु कापूर म्हणाले. अनु कपूर हे चेष्टेच्या स्वरात बोलत होते पण एका सार्वजनिक मंचावर चुकीच्या पद्धतीने केलेल्या कमेंटमुळे अभिनेते अनु कपूर ट्रोल होतायत. पण या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्या तमन्ना भाटियावरच्या कमेंटला 'सेक्सीस्ट ' म्हटले आहे. अनेकांनी या व्हिडीओवर नाराजी व्यक्त केल्याचं दिसलंय.

📚 Related News