Madalsa Sharma Reveals Casting Couch In South Film Industry: मिथुन चक्रवर्तींची सून, स्टार अभिनेत्री; तरीसुद्धा झालेली कास्टिंग काऊचची शिकार, म्हणाली...

Madalsa Sharma Reveals Casting Couch In South Film Industry: मिथुन चक्रवर्तींची सून, स्टार अभिनेत्री; तरीसुद्धा झालेली कास्टिंग काऊचची शिकार, म्हणाली...
By : | Updated at : 30 Oct 2025 01:13 PM (IST)

Madalsa Sharma Reveals Casting Couch In South Film Industry:बॉलिवूडचे (Bollywood News) डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्या डान्स स्टेप्स आजही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. एक काळ असा होता की, 75 वर्षाच्या अभिनेत्यानं अख्खी इंडस्ट्री हादरवून सोडलेली. त्यावेळच्या दिग्गज अभिनेत्याचं स्टारडम मिथुन चक्रवर्तींना हादरवलं होतं. मिथुन चक्रवर्तींची सूनही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत इंडस्ट्रीत नाव कमावतेय. मिथुन चक्रवर्तींची सून म्हणजे, सुप्रसिद्ध अभिनेत्री मदालसा शर्मा (Madalsa Sharma).

मदालसा शर्मानं हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये काम करण्यापूर्वी अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं. रुपाली गांगुलीच्या 'अनुपमा' शोमध्ये तिनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकलीत आणि अलीकडेच विवेक रंजन अग्निहोत्रीच्या 'द बंगाल फाइल्स' या चित्रपटातही ती दिसलेली. पिंकव्हिलाला दिलेल्या एका खास मुलाखतीत मदालसानं साऊथ सिनेमांपासून फारकत घेऊन बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचं कारण सांगितलं आहे. जेव्हा मदालसा शर्माला विचारलं गेलं की, काही वर्ष काम केल्यानंतर साऊथ इंडस्ट्री का सोडलीस? त्यावेळी अभिनेत्रीनं सांगितलं की, तिला काही वाईट अनुभवांचा सामना करावा लागला, त्यामुळे तिन साऊथ इंडस्ट्री सोडून दिली. ती म्हणाली की, "तिथे मला काही खराब अनुभव आलेत.

जे मी अजिबात सहन करू शकली नाही. मला ते कधीच जमलं नसतं. " मदालसा शर्मासोबत कास्टिंग काऊच ज्यावेळी मदालसा शर्माला विचारलं गेलं की, ती कोणत्या रस्त्याबाबत बोलतेय. त्यावेळी ती म्हणाली की, "कास्टिंग काऊच आणि इतर सर्वच गोष्टी. मला वाटतं की, हे प्रत्येक ठिकाणी आहे.

मी साऊथ इंडस्ट्रीत खूपच निराश झालेले. कोणताच अनुभव घेतला नाही, पण एका संभाषणामुळे मला अस्वस्थ वाटलं. मला आठवत नाही, मी 17 वर्षांची होते. काही वर्ष झाली आहेत. पण मला आठवतं की, मीटिंगमध्ये अस्वस्थ वाटत होतं आणि उठून बाहेर पडताना मी स्वतःला म्हणाले, 'चला आता परत ला जाऊया.

' जे हवंय, ते मी स्वतःच ठरवते. "प्रत्येकाने एक लक्ष्य ठरवलेलं असतं आणि तिथे पोहोचण्यासाठी आपण काही ना काही करत असतो. माझं लक्ष्य हे महत्वाकांक्षा आहे. पण ते इतकंही मोठं नाही की त्यामुळे मी सगळं विसरेन. कोणती गोष्ट मला हवी आहे, कोणती नको आणि काय किंमत मोजून मला ती मिळवायची आहे, मी या सगळ्याचा विचार करूनच निर्णय घेते", असंही मदालसाने सांगितलं.

दरम्यान, मदालसा शर्मा अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे. तिनं 2009 मध्ये तेलुगु सिनेमा 'फिटिंग मास्टर'मधून पदार्पण केलं. नंतर ती अनेक प्रादेशिक चित्रपटांमध्ये दिसली, ज्यात 'शौर्य', 'आलस्याम अमृतम', 'थम्बिकु इंधा ऊरु', 'मेम वयासुकु वाचम', 'पथयेरम कोडी', 'डोव', 'सुपर 2' सारख्या सिनेमांचा समावेश आहे. राजश्री प्रॉडक्शनच्या सम्राट अँड कंपनीसह ती काही बॉलीवूड चित्रपटांमध्येही दिसली. महत्त्वाच्या इतर बातम्या :.

📚 Related News