Mamta Kulkarni Controversial Statement On Dawood Ibrahim:नव्वदच्या दशकातली ग्लॅमरस अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) नेहमीच वादाच्या भोवऱ्यात दिसलीय. तिचं आयुष्य घोटाळे, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या अफवांमुळे चर्चेत आलेलं. पडद्यावर साकारलेल्या बोल्ड भूमिका आणि स्क्रीन प्रेजेंसमुळे ममता कुलकर्णी अल्पावधीच प्रसिद्धीझोतात आली. पण, जेवढ्या लवकर ती प्रसिद्धीझोतात आली, तशीच अंडरवर्ल्डशी संबंध आणि एका कुख्यात ड्रग केसमध्ये नाव आल्यामुळे तिची प्रसिद्धी फिकी पडली. अशातच आता पुन्हा एकदा ममता कुलकर्णी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
त्यासाठी कारण ठरतंय तिनं केलेलं वक्तव्य. ममता कुलकर्णी म्हणाली आहे की, "दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) दहशतवादी नाही. " ममता कुलकर्णीनं कित्येक वर्षांनंतर अंडरवर्ल्डच्या सर्वात मोठ्या डॉनचं नाव घेऊन एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ममता कुलकर्णी माध्यमांशी बोलताना म्हणाली की, "दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही. आणि त्यानं बॉम्बस्फोटही घडवून आणलेले नाहीत.
बॉम्बस्फोटासारख्या घटनांमध्ये त्याचं नाव कधीच आलेलं नाही. माध्यमं आणि काही राजकीय शक्ती यांनी कट रचून त्याला बदनाम केलंय. एखादी व्यक्ती गुन्हेगार असण्यासाठी तिच्यावर आरोप सिद्ध होणं गरजेचं असतं, फक्त प्रचार केल्यानं कुणीच गुन्हेगार ठरत नाही. " "दाऊदशी माझं काहीच देणं-घेणं नाही. " ममता कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाली की, "दाऊदशी माझं काहीच देणंघेणं नाही.
कुणा एखाचं नाव नक्कीच होतं. पण तुम्हीच पाहा, त्यानं बॉम्बस्फोट घडवून आणलेला नाही. देश विघातक कृत्य केलेली नाहीत, ज्याच्यासोबत माझं नाव जोडलं गेलंय. त्यानं कधीही बॉम्ब ब्लास्ट केलेला नाही. मी दाऊदला उभ्या आयुष्यात कधीच भेटेलेल नाही.
" अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध अन् ड्रग केसमध्ये आलेलं नाव. ममता कुलकर्णीच्या आयुष्यातील सर्वात चर्चेत असलेला एक पैलू म्हणजे, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी असलेले तिचे कथित संबंध. 1998 मध्ये, राजनसोबतच्या तिच्या संबंधांच्या अफवा पसरू लागल्या आणि त्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनल्या. 'चायना गेट'च्या सेटवर झालेल्या घटनेनंतर ममता कुलकर्णीचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध अधिक तीव्र झाले. राजकुमार संतोषीशी झालेल्या मतभेदानंतर तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं.
राजनकडून धमक्या मिळाल्यानंतर पुन्हा ममता कुलकर्णीला सिनेमात घेतल्याचं बोललं जातंय. चित्रपटाच्या अपयशामुळे तिला मोठा धक्का बसला आणि तिनं राजकुमार संतोषीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. ममता कुलकर्णी कोण? 1990 च्या दशकात 'करण अर्जुन', 'कृष्णा', 'बाजी' आणि 'क्रांतिवीर' सारख्या सुपरहिट चित्रपटांमधून स्टारडम मिळवणाऱ्या ममता कुलकर्णीला 'इट गर्ल' म्हणून ओळखलं जायचं. अल्पावधीतच कमालीचं स्टारडम मिळवूनही 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात ती अचानक गायब झाली. 2016 मध्ये, केनियामध्ये तिचा कथित पती विक्रम गोस्वामी (विक्की) याला अटक करण्यात आली, तेव्हा तिचं नाव ड्रग्ज तस्करी प्रकरणात समोर आलं.
छोटा राजन आणि दाऊद गँगमधील शत्रुत्वात सहभागी असल्याचा आरोपही विक्कीवर असल्यानं दाऊदचं नावही यात आलं. पण, ममतानं हे आरोप सातत्यानं नाकारलेत. 2025 च्या कुंभमेळ्यापूर्वी ती भारतात परतली. तिच्या मते, तिनं 12 वर्ष तपश्चर्या केली. कुंभमेळ्यात तिनं संन्यास घेतला आणि 'माई ममता नंद गिरी' या नावानं आध्यात्मिक जीवन स्वीकारलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :.








