Raju Gore on Satara SP: अंधारेंच्या वक्तव्याला दुजोरा; अश्विनी बिद्रेंच्या पतीचे तुषार दोशींवर ताशेरे, म्हणाले त्यावेळी खो घातला होता अन्...

Raju Gore on Satara SP: अंधारेंच्या वक्तव्याला दुजोरा; अश्विनी बिद्रेंच्या पतीचे तुषार दोशींवर ताशेरे, म्हणाले त्यावेळी खो घातला होता अन्...
By : | Updated at : 30 Oct 2025 08:50 AM (IST)

:फलटणमधील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या (phaltan doctor case) प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्याकांडाचा दाखला देऊन अंधारेंनी खुनाचा संशय व्यक्त केला आहे. युवती डॉक्टर (phaltan doctor case) मृत्यू प्रकरणात पोलीस काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनीही सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर तपासाच्या अनुषंगाने काही गंभीर आरोप केले आहेत. (phaltan doctor case) बिद्रे हत्याकांडाच्या तपासात याच तुषार दोशी यांनी माध्यमांशी बोलताना (phaltan doctor case) सांगितलं की, आरोपी अभय कुरुंदकर याला मदत केली होती.

आम्ही त्यांची तक्रार तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. परंतु आश्चर्यकारकरित्या त्यांना पुढे राष्ट्रपती पदक मिळाले. आताही तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखालीच फलटण युवती डॉक्टरच्या मृत्यूचा तपास होणार असल्याने तिला न्याय मिळेल असे वाटत नाही, असे राजू गोरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. (phaltan doctor case) Phaltan Doctor Case:तुषार दोशींनी त्यावेळी खो घातला होता अन्. राजू गोरे म्हणाले, अश्विनी बिद्रे हत्याकांडाबाबत सुषमा अंधारे यांनी जे खुलासे केले, त्या अनुषंगाने जी वक्तव्ये केली ती अगदी बरोबर आहेत.

अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये तुषार दोशी यांनी आरोपी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर याला मदत करण्याची भूमिका घेतली होती. त्यावेळी तपासाची जबाबदारी क्राइम डीसीपी म्हणून तुषार दोशी यांच्याकडेच होती. पोलीस अधिकारी संगीता अल्फान्सो यांनी एका आरोपीची माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयारी केली असताना याच तुषार दोशींनी त्यावेळी खो घातला. या सगळ्या तक्रारी मी मुख्यमंत्र्यांकडे केल्या परंतु त्याचा काही फायदा झाला नाही, उलट पुढे जाऊन दोशी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिक मिळाले, असे गोरे म्हणाले आहेत. Phaltan Doctor Case:.

तर डॉक्टर तरूणीला न्याय मिळेल असे वाटत नाही त्याचमुळे डॉक्टर युवतीच्या मृत्यू प्रकरणाची जबाबदारी किंबहुना सातारा जिल्ह्याची जबाबदारी जर दोशी यांच्याकडेच राहिली तर डॉक्टर तरूणीला न्याय मिळेल असे वाटत नाही, असंही राजू गोरे म्हणालेत. अश्विनी आणि कुरुंदकरच्या मेसेजच्या तफावतीमुळेच गुन्ह्याची उकल होऊ शकली. हे मेसेज सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता शिंदे अल्फान्सो यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाहीत. कुरुंदकर हाच आरोपी आहे, त्यानेच अश्विनीचे बरे वाईट केले, या अंतिम निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आणि त्या अनुषंगाने पुढचा तपास झाला, असे राजू गोरे म्हणालेत. Sushma Andhare Post:सुषमा अंधारेंची सोशल मिडीया पोस्ट आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी हस्ताक्षरातील फरकावरून अश्विनी बिद्रे प्रकरणाचा दाखला दिला होता.

हे केस ज्यांनी लढली ते अश्विनी बिद्रे यांचे पती श्री गोरे साहेब यांनी माझ्या म्हणण्याला पुष्टी देत नवा धक्कादायक खुलासा केला. सध्या एसपी असलेले तुषार दोशी हेच अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणांमध्ये क्राइम ऑफिसर होते, अशी सोशल मिडीया पोस्ट अंधारेंनी केली आहे. Phaltan Doctor Case:डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांशी राहुल गांधींचा फोनवरून संवाद फलटणच्या डॉक्टर तरुणीचा आत्महत्येनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तरुणीचा कुटुंबीयांची भेट घेतली. यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाशी फोनवरून संवाद साधला. राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबाकडून जाणून घेतली.

या घटनेत आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी पीडित कुटुंबाकडून करण्यात आली आहे. Phaltan Doctor Case: पीडित डॉक्टरच्या वडिलांची प्रतिक्रिया. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील कुटुंबासमवेत फोनवरून संवाद साधला. यावेळी कुटुंब मराठीत बोलत होते. राहुल गांधी हे सर्व ऐकून घेत होते.

'तुम्हाला आता काय हवंय ? ' असं राहुल गांधीनी विचारताच पीडित कुटुंबांनी या प्रकरणी 'SIT चौकशी आणि आरोपींना फाशी ' या दोन्ही गोष्टीची मागणी केली. यावेळी राहुल गांधींनी होकार देत तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वासित केले. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा थेट दबाव पोलीस प्रशासनावर आहे त्यामुळे पोलीस चौकशी करत नाहीत असा गंभीर आरोप केलाय.

📚 Related News