Horoscope Today 30 October 2025: आजचा गुरूवार 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरूंची मोठी कृपा, फळ मिळेल, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 30 October 2025: आजचा गुरूवार 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरूंची मोठी कृपा, फळ मिळेल, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
By : | Updated at : 30 Oct 2025 12:01 AM (IST)

Horoscope Today 30 October 2025:वैदिक पंचांगानुसार, आज 30 ऑक्टोबर 2025, आजचा वार गुरूवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल.

भगवान दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या. मेष रास (Aries Horoscope Today) मेष राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये एखाद आश्वासन वरिष्ठांनी न पाळल्यामुळे थोडा मानसिक त्रास होईल वृषभ रास (Taurus Horoscope Today) वृषभ राशीच्या लोकांनो आज मुलांची थोडे मतभेद संभवतात महिलांचे घरात जास्त लक्ष राहील मिथुन रास (Gemini Horoscope Today) मिथुन राशीच्या लोकांनो आज तुमच्या हसतमुख आणि मनमोकळ्या स्वभावामुळे आज मित्र मैत्रिणींचे कोंडाळे तुमच्या भोवती कायम राहील कर्क रास (Cancer Horoscope Today) कर्क राशीच्या लोकांनो आज राजकारणातील लोकांना आपले करिअर करण्याची चांगली संधी मिळेल फक्त त्यासाठी थोडा मानसिक त्रास सहन करावा लागेल सिंह रास (Leo Horoscope Today) सिंह राशीच्या लोकांनो आज तुम्ही हुशार असलात तरी तुमची हुशारी विधायक कामाकडे लावायला हवी, हे मात्र निश्चित दुसऱ्यावर टीका अजिबात नको कन्या रास (Virgo Horoscope Today) कन्या राशीच्या लोकांनो आज आज थोडा मनस्ताप होईल हट्टीपणा आणि अहंकार या दोन गोष्टी प्रगतीला मारक राहतील तूळ रास (Libra Horoscope Today) तूळ राशीच्या लोकांनो आज घरातील मोठ्यांचे विचार न पटल्यामुळे वाद निर्माण होऊ शकतात, महिलांना वैवाहिक जीवनात समजूतीचे धोरण स्वीकारावे लागेल वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today) वृश्चिक राशीच्या लोकांनो आज भूतकाळाची खंत आणि भविष्यकाळाची चिंता तुम्हाला राहणार नाही, आवश्यक कामे संपावायच्या मागे लागाल धनु रास (Sagittarius Horoscope Today) धनु राशीच्या लोकांनो आज वडिलोपार्जित इस्टेटिसंबंधी कागदपत्रे जमवण्यासाठी संबंधित व्यक्तींच्या संपर्कात याल, जवळच्या प्रवासाचे योग येतील मकर रास (Capricorn Horoscope Today) मकर राशीच्या लोकांनो आज व्यवसाय नोकरीमध्ये महत्त्वाच्या लोकांच्या मनाविरुद्ध वागाल, त्यामुळे कामा ऐवजी संघर्षाचे प्रसंग जास्त येतील कुंभ रास (Aquarius Horoscope Today) कुंभ राशीच्या लोकांनो आज सरासर विचार करून निर्णय घ्या, गरजेला तो पडेल काय, या युक्तीप्रमाणे जसे बोलाल तसे वागण्याचा प्रयत्न करा मीन रास (Pisces Horoscope Today) मीन राशीच्या लोकांनो आज तुमच्या प्रभावी बोलण्यामुळे जवळपासचे लोक प्रभावी होतील, आर्थिक दृष्टीने फायदा करून घेण्यासाठी त्याचा उपयोग करा. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ).

📚 Related News