Silicon Valley Sex Warfare:सिलिकॉन व्हॅलीमध्ये सुरू असलेल्या स्टार्टअपवर आता ‘सेक्स वॉरफेअर’ची (Silicon Valley Sex Warfare) छाया पडू लागली आहे. चीन आणि रशिया हे दोन्ही देश केवळ पारंपारिक हेरगिरीच्या पद्धतींपर्यंत मर्यादित न राहता, तंत्रज्ञान आणि व्हेंचर कॅपिटल क्षेत्रात रोमँटिक हेरगिरीचा नवा डाव टाकत आहेत. या मोहिमेचा उद्देश अमेरिकेची बौद्धिक संपदा चोरणे आणि तिच्या तांत्रिक वर्चस्वाला धक्का देणे हा आहे. तज्ज्ञांच्या मते, या हेरगिरी पद्धतीला “सेक्स वॉरफेअर” (Silicon Valley Sex Warfare) असे नाव देण्यात आले असून, ती मानवी संबंध आणि डिजिटल फेरफार यांच्या मिश्रणातून कार्यरत आहे. परदेशी एजंट अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींशी रोमँटिक संबंध, ऑनलाइन मैत्री अथवा विवाहाच्या माध्यमातून जवळीक साधतात.
या वैयक्तिक नात्यांचा उपयोग करून ते व्यापार गुपिते आणि संवेदनशील डेटा हस्तगत करतात. हनीपॉटचा नवनवीन प्रकार काही प्रकरणांमध्ये आकर्षक तरुण चिनी महिलांकडून एका माजी प्रति-गुप्तचर अधिकाऱ्याने तर सांगितले की, एका रशियन महिलेने अमेरिकन एरोस्पेस अभियंत्याशी विवाह केला आणि त्या माध्यमातून दीर्घकाळ गुप्त माहितीपर्यंत प्रवेश मिळवला. अशा ‘हनीपॉट’ पद्धतीच्या हेरगिरी मोहिमा आजही सक्रिय असल्याचे अमेरिकन गुप्तचर संस्थांचे निरीक्षण आहे. हे सर्व का केलं जातंय? या हेरगिरीचं मूळ ध्येय स्पष्ट आहे, अमेरिकेचं तंत्रज्ञान आणि नवकल्पना क्षेत्रातील वर्चस्व उद्ध्वस्त करणे. बौद्धिक संपदा चोरी:अमेरिकेला दरवर्षी सुमारे $600 अब्ज डॉलरचं नुकसान होतं, ज्यात बहुतांश नुकसान चीनशी जोडलेलं आहे.
आर्थिक हेरगिरी:चीन अमेरिकन संरक्षण विभागाने वित्तपुरवठा केलेल्या स्टार्टअप्समध्ये गुप्त गुंतवणूक करून नव्या तंत्रज्ञानांवर नियंत्रण मिळवत आहे. मानवी कमकुवतींचा वापर: हेरगिरी एजंट वैयक्तिक आकर्षण, सोशल मीडिया संवाद आणि भावनिक संबंधांचा वापर करून अमेरिकन कर्मचाऱ्यांकडून संवेदनशील माहिती मिळवत आहेत. अमेरिकन कायदे आणि गोपनीयता नियमांमुळे प्रतिउपाययोजना करणं कठीण झालं आहे, आणि याचाच फायदा चीन-रशिया घेत आहेत. अमेरिकन उद्योगातील मानवी असुरक्षिततेचा फायदा चीन आणि रशिया या दोन्ही देशांचा उद्देश स्पष्ट आहे. अमेरिकेचे तांत्रिक वर्चस्व कमकुवत करणे आणि त्यांच्या नवकल्पनांवर नियंत्रण मिळवणे.
बौद्धिक संपदेच्या चोरीमुळे अमेरिकेला दरवर्षी सुमारे 600 अब्ज डॉलरचे नुकसान होत असल्याचे अंदाज आहे, ज्यातील बहुतांश हानी चीनशी संबंधित आहे. याशिवाय, चीन अमेरिकन संरक्षण विभागाकडून निधी मिळवणाऱ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करून संवेदनशील तंत्रज्ञानावर अप्रत्यक्ष पकड मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे. ही संपूर्ण रणनीती ‘सॉफ्ट इकॉनॉमिक हेरगिरी’ म्हणूनही ओळखली जाते. या माध्यमातून परदेशी राष्ट्रे अमेरिकन उद्योगातील मानवी असुरक्षिततेचा फायदा घेत आहेत. अमेरिकेतील कायदे आणि सामाजिक संरचना या प्रकारच्या हेरगिरीला थोपवण्यासाठी आवश्यक प्रतिउपाययोजना राबविण्यात अडथळा ठरत आहेत.
परिणामी, चीन आणि रशियाला या क्षेत्रात फायदा मिळत असल्याचे तज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसोबतच तिच्या नवकल्पना आणि उद्योगांच्या गुप्ततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात सुरू असलेली ही ‘सेक्स वॉरफेअर’ लढाई ही केवळ गुप्तहेरगिरी नव्हे, तर तांत्रिक वर्चस्वासाठी सुरू असलेले शीतयुद्धाचे नवे रूप असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.







