Pimpri Nakul Bhoir case : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर (Nakul Bhoir) यांच्या हत्येत नवा ट्विस्ट आला आहे. पत्नी चैताली हिने प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार (Siddharth Deepak Pawar) याच्या मदतीने हत्या केल्याचं चिंचवड पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे नकुल भोईर हत्याकांडात मोठा उलगडा झाला आहे. नकुल आणि चैताली यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला.
रागाच्या भरात असलेल्या पत्नीने पती (Pune Crime News) नकुलचा कापडाने गळा आवळून खून केला (Pune Crime News) अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र आता या हत्याकांडात तिचा मित्रही सहभागी असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी अत्यंत वेगात तपासचक्रे फिरवून सत्य समोर आणलं आहे. याप्रकरणी चैताली आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. 24 ऑक्टोबर शुक्रवारी पहाटे नकुल भोईर यांची गळा आवळून हत्या करण्यात आली होती.
सुरुवातीला ही घटना संशयास्पद वाटत नव्हती, मात्र पोलिसांनी कसून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना नकुलची पत्नी चैताली हिच्यावर संशय आला. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता, तिने हत्येची कबुली दिली आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. चैतालीने तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार याला सोबत घेऊन नकुलची हत्या केल्याचं उघड झालं आहे. चिंचवड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सिद्धार्थ दीपक पवार यालाही अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नकुल भोईर हे पत्नी चैताली हिला मद्यपान न करण्याबद्दल, परपुरुषांसोबत फिरू नकोस आणि कर्ज काढू नकोस अशा गोष्टी वारंवार सांगत होते. याच गोष्टींचा राग मनात धरून चैतालीने नकुलच्या हत्येचा कट रचला आणि प्रियकराच्या मदतीने तिने नकुलचा जीव घेतला. चिंचवड पोलिसांच्या या जलद आणि अचूक तपासाने हत्येच्या घटनेमागील सत्य समोर आलं असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलीस नेमकं काय म्हणाले? (Pimpri Police on Nakul Bhoir case) याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक गोसावी यांनी माहिती दिली. गेल्या 24 ऑक्टोबरला नकुल भोईर यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यात आरोपी म्हणून त्यांची पत्नी चैताली भोईर यांना अटक करण्यात आली होती. अधिक तपास केला असता, त्यामध्ये आणखी एकाचा सहभाग असल्याचं समोर आलं. त्यानुसार त्यांचाच मित्र सिद्धार्थ दीपक पवार यालाही अटक करण्यात आलं. आता पुढील तपास सुरु आहे. सुरुवातील तिघेजण एकत्र बसले होते.
त्यावेळी त्यांची हत्या झाली. हत्या झाल्यानंतर आम्ही घटनास्थळी गेल्यानंतर दीपक पवार निघून गेले. पण ते निघून का गेले याची आम्ही चौकशी करत होतो. सीसीटीव्ही तपासून आम्ही सिद्धार्थ दीपक पवार याची चौकशी केल्यानंतर विसंगती आढळली. त्यानुसार त्याला अटक केली आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
दोन मुलं पोरकी नकुल आणि चैताली या दाम्पत्याला दोन चिमुकली मुलं आहेत. या हत्याकांडामुळे पाच आणि दोन वर्षांची लेकरं पोरकी झाली आहेत. आई चैतालीने वडील नकुलची हत्या केली. पोलिसांनी चैतालीला अटक केली. त्यामुळे या लेकरांचं आभाळच फाटलं आहे.
पत्नीला नगरसेवक बनवण्याचं स्वप्न मृत नकुल भोईर हा पत्नीला नगरसेवक बनवण्याच्या तयारीत होता. नकुलचा सामाजिक कार्यामध्ये मोठा वाटा होता, मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमामध्ये तो जिकरीने सहभाग घ्यायचा अनेक संघटनांची देखील त्याचे संबंध राजकीय नेत्यांशी देखील त्याचे जवळचे संबंध होते, सामाजिक कार्याचा वारसापुढे चालवण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला नगरसेवक बनवायचे ठरवलं होते यासाठी आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तो त्याच्या पत्नीला उभे देखील करणार होता. संबंधित बातम्या.






