Parbhani News : राज्याच्या विवध भागात होताना दिसत आहेत. नांदेडमध्ये शासकीय अधिकाऱ्यांची गाडी फोडल्याची घटना ताजी असतानाच आज परभणीतही शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातच हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. दगडफेक करणारा शेतकरी असल्याची माहिती मिळाली आहे.
शेतकऱ्याने दगड टाकून फोडली जिल्हाधिकाऱ्यांची गाडी नांदेडनंतर परभणीतही शासकीय अधिकाऱ्यांची गाडी फोडल्याची घटना घडली आहे. संजयसिंह चव्हाण हे परभणीचे जिल्हाधिकारी आहेत. शेतकऱ्याने त्यांची गाडी फोडली आहे. काल नांदेड येथील तहसीलदारांच्या गाडीच्या तोडफोडीनंतर आज परभणीतही जिल्हाधिकारी यांची गाडी फोडण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावण्यात आलेली जिल्हाधिकाऱ्यांची गाडी एका शेतकऱ्याने दगड टाकून फोडली.
हा शेतकरी नेमका कोण आहे? हे अद्याप समजले नसले तरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वातावरण मात्र तणावाचे निर्माण झाले आहे. दरम्यान पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून त्याची माहिती घेण्याचे काम चालू आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका शेतकऱ्याने थेट तहसिलदारांची गाडी फोडली जिल्ह्यातील मुदखेड येथे एका शेतकऱ्याने थेट तहसिलदारांची गाडी फोडल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. याप्रकरणी, 34 वर्षीय शेतकरी साईनाथ खानसोळे याला पोलिसांनी अटक केली आहे. अतिवृष्टीग्रस्त असूनही आपल्याला शासनाच्या अनुदानाचा अद्यापही लाभ न मिळाल्याने आपण तहसिलदारांच्या गाडीची तोडफोड केल्याचं त्यांने म्हटले.
विशेष म्हणजे तहसील कार्यालयातच तहसीलदाराचे वाहन उभे होते, इथेच जाऊन त्याने तहसिलदारांच्या गाडीच्या काचा फोडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता, याप्रकरणी, तहसिलदारांनी आपली बाजू मांडली आहे. सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील अनुदानाचे पैसे अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाहीत, शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही, असे म्हणत त्याने फावड्याने तहसीलदारांची गाडी फोडली. या घटनेनं तहसील परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. तसेच, तेथील प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी पोलिसांना ताब्यात घेऊन घटनेची माहिती दिली.
त्यानंतर, पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. साईनाथ खानसोळे असं या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याच्या खात्यात यावर्षीचे अतिवृष्टीचे 6,200 रुपये अनुदान जमा झाले होते. मागच्या वर्षीचे अनुदान देखील त्यांना मिळाले होते, असा खुलासा तहसिलदार आनंद देऊळगावकर यांनी केला आहे.






