Triekadash Yog 2025 :वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाला ग्रहांचा शासक ग्रह मानतात. हा ग्रह बुद्धी, व्यापार, तर्क-वितर्क, शिक्षा, बौद्धिक क्षमतेचा कारक ग्रह मानण्यात आला आहे. बुध ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात. बुध ग्रह एका राशीत जवळपास 15 दिवसांपर्यंत स्थित असतात. त्यानुसार, बुध ग्रह महिन्यातून दोनदा राशी परिवर्तन करतात.
यामुळे बुध ग्रहाची कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर युती होते किंवा दृष्टी पडते. यामुळे अनेक शुभ योग निर्माण होतात. सध्या बुध ग्रह वृश्चिक राशीत विराजमान आहे. या ठिकाणी मंगळ ग्रह आधीपासूनच विराजमान आहे. बुधाच्या या राशीत असल्यामुळे शनीच्या मकर राशीत विराजमान असलेल्या यम ग्रहाबरोबर संयोग होऊन लाभ दृष्टी योगसुद्धा जुळून आला आहे याला त्रिएकादश योगसुद्धा म्हणतात.
त्यामुळे तीन राशींना चांगला लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी बुध आणि यम ग्रह एकमेकांच्या 60 डिग्रीवर असणार आहेत. त्यामुळे काही राशींचं नशीब उजळण्याची शक्यता आहे. मेष रास (Aries Horoscope) या राशीच्या लोकांसाठी बुध-यमचा त्रिएकादश योग फार खास असणाप आहे.
या राशीच्या आठव्या चरणात बुध आणि दहाव्या चरणात यम विराजमान आहे. त्यामुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल. तसेच, तुमच्या कामात तुम्हाला कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल. जे काम तुमचं अनेक दिवसांपासून रखडलेलं होतं त्या कामातून तुमची सुटका होईल. कुंभ रास (Aquarius Horoscope) कुंभ राशीसाठी बुध-यमचा केंद्र दृष्टी योग फार अनुकूल ठरणार आहे.
या राशीच्या लोकांच्या पद-प्रतिष्ठेत चांगली वाढ पाहायला मिळेल. प्रतिस्पर्ध्यांशी तुमची टक्कर असेल. तसेच, तुमच्या व्यवसायातही चांगले धनलाभाचे योग जुळून येणार आहे. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. बौद्धिक क्षमतेत वाढ होईल.
तसेच, जीवनात सुख-शांती टिकून राहील. तूळ रास (Libra Horoscope) तूळ राशीसाठी लोकांसाठी बुध-यम ग्रहाची युती फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, तुमच्या धनसंपत्तीत चांगली भरभराट पाहायला मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.
तसेच, कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, वाहन, घर किंवा प्रॉपर्टी तुम्ही विकत घेऊ शकता. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ).







