Beed: बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. नुकत्याच पंधरा लाखांच्या दरोड्याच्या घटनेचा तपास अद्याप सुरू असतानाच, आता बीडजवळील पाली गावातील कॅनरा बँकेवर दरोडा( Robbery News) पडला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी बँकेच्या पाठीमागील भिंतीला छेद करून आत प्रवेश केला. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा दरोडा टाकण्यात आला आहे.
या दरोड्यामुळे ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Beed Crime) गॅस कटरच्या सहाय्याने बँकेची तिजोरी फोडली चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने बँकेची तिजोरी फोडली आणि त्यातील लाखो रुपयांचा ऐवज आणि रोख रक्कम लंपास केली. प्राथमिक अंदाजानुसार, चोरी गेलेल्या रकमेत मोठी रक्कम असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र नेमकी आकडेवारी अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेली नाही. सकाळी नेहमीप्रमाणे कर्मचारी बँकेत आल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. बँकेच्या आत पसारा आणि तिजोरी फोडलेली पाहून त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांना कळवले.
या दरोड्यानंतर स्थानिकांमध्ये आणि ग्राहकांमध्ये मोठी भीती आणि संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, पाली गावातील या बँक दरोड्यामुळे बीड पोलिसांपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच बीड शहरात पंधरा लाखांच्या दरोड्याची घटना घडली होती, आणि आता पुन्हा अशाच प्रकारचा बँक दरोडा घडल्याने जिल्हा पोलिसांची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली असल्याचं स्पष्ट होत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, परिसरातील हालचाली आणि संशयित वाहनांची तपासणी सुरू केली आहे. ग्रामीण पोलिसांसह फॉरेनसिक टीमकडून तपासाला सुरुवात बीड तालुक्यातील पाली गावात कॅनरा बँकेची शाखा आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास याच बँकेवर दरोडेखोरांनी सशस्त्र धाडसी दरोडा टाकला अगदी सिनेमाला शोभेल असा. दरोडा टाकून दरोडेखोरांनी जवळपास 18 लाखांची रोकड लंपास केली असं प्रथम दर्शनी दिसून आले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांसह फॉरेनसिक टीम सर्व घटनेचा तपास करत आहे. दरोडेखोरांनी आधी रेकी करून बँकेवर दरोडा टाकला. मध्यरात्रीच्या सुमारास हा दरोडा टाकला गेला.
बँकेच्या पाठीमागील असलेल्या भिंतीला गॅस कटरच्या सहाय्याने 16 इंच ड्रिल करण्यात आलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये चित्रित होऊ नये याची संपूर्ण खबरदारी दरोडेखोरांनी घेतली. त्यामुळे चोरट्यांपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. पाली गावात असलेल्या या बँकेची सुरक्षा केवळ सात सीसीटीव्ही कॅमेराच्या भरोशावर होती. कोणताही सुरक्षा गार्ड या ठिकाणी तैनात नाही.
त्यामुळे अगदी वेळ घेऊन दरोडेखोरांनी बँकेवर हात साफ केला. यापूर्वी दोन वेळा या बँकेवर चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे सुरक्षारक्षकाची मागणी ग्रामस्थांनी केली होती. दरम्यान आता दरोडेखोर नेमके किती होते? दरोड्याची आणखी रक्कम किती? असे अनेक प्रश्न सोडविण्याचे आव्हान बीड पोलिसांसमोर आहे.








