अंबरनाथ हादरलं! प्रसिद्ध डॉक्टर पत्नीच्या डोक्यात खलबत्त्याचा घाव घातला, जागेवरच कोसळली, नेमकं काय घडलं?

अंबरनाथ हादरलं! प्रसिद्ध डॉक्टर पत्नीच्या डोक्यात खलबत्त्याचा घाव घातला, जागेवरच कोसळली, नेमकं काय घडलं?
By : | Updated at : 30 Oct 2025 03:08 PM (IST)

Thane Crime:अंबरनाथ शहरातील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. किरण शिंदे यांच्यावर त्यांच्या पतीने खलबत्त्याने जीवघेणी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात आणि स्थानिक समाजात प्रचंड खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून चिडलेल्या पतीने खलबत्त्याने त्यांच्या डोक्यात जोरदार मारहाण केली, इतकंच नव्हे तर गळा पकडून जीव घेण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप जखमी डॉक्टरांनी केला आहे. सध्या डॉ.

शिंदे यांच्यावर बदलापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. (Ambarnath Crime) Ambarnath crime : नेमके घडले काय? मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. किरण शिंदे या अंबरनाथ पश्चिमेतील मोहन सबर्बिया गृह संकुलात पती विश्वंभर शिंदे आणि दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या गाण्याचा रियाज करण्यासाठी उठल्या आणि नंतर पतीसाठी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. त्याचवेळी पती विश्वंभर शिंदे यांच्यातील जुना कौटुंबिक वाद पुन्हा पेटला.

रागाच्या भरात विश्वंभर यांनी अचानक किचनमध्ये येऊन पत्नीचा गळा पकडला आणि खलबत्त्याने त्यांच्या डोक्यात जबर मारहाण केली. डॉ. शिंदे यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली असून, त्या तात्काळ जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या आरडाओरड ऐकून मुलांनी किचनमध्ये धाव घेत आईची सुटका केली आणि तत्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना बदलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पिडीत महिला डॉक्टरने सांगितले. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी चार साडेचार वाजता मी उठले. नेहमीप्रमाणे गायनाचा रियाज करायला बसले. मुलगा च्या रूम मध्ये झोपतो तिथे शांतपणे बसले होते. मी पतीला विचारलं चहा घेशील का ? याचा एक दिवस आधी आम्ही माथेरानला गेलो होतो.

त्यावेळी माझ्या शाळेतील एका मित्राने नाईस डीपी. असा काहीसा मेसेज केला होता. पतीला त्याचा राग होता. तू किचनमध्ये आला. हातात खलबत्ता घेतला.

मारहाण करताना मला ढकललं. गळा दाबला. खलबत्त्याने डोक्यावर घाव घालायला सुरुवात केली. डोक्यात आघात झाल्यामुळे मी ओरडायला लागले त्यावेळी मुलं जागी झाली. त्यांनी मध्ये पडून मला वाचवण्याचा प्रयत्न केला.

पण तरीही तो मारतच होता. ' 'माझ्या डोक्यातून रक्त निघायला लागलं. त्याचा संपूर्ण टी-शर्ट रक्ताने माखला. त्यामुळे माझी मागणी हीच आहे की त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तलाठक करण्यात यावी.

मी हे बऱ्याचदा सहन केला आहे. मुलांसाठी मी पुन्हा एकत्र राहण्याचा ठरवलं. पण यावेळी हे इतकं टोकाला गेलं की माझा जीव गेला असता. हा जीवघेणा हल्ला होता. " असं महिलेनं सांगितलं.

पोलीस तपास सुरु पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातूनच हा हल्ला झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण असून, अनेक स्थानिकांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. समाजातील सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र धक्का बसला आहे. डॉ.

किरण शिंदे या अंबरनाथ शहरातील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट असून, अनेक वर्षांपासून त्या वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

📚 Related News