Ajinkya Raut Play Role of Chhatrapati Shivaji Maharaj: छोट्या पडद्यावरचा अभिनेता झळकणार रुपेरी पडद्यावर; साकारणार छत्रपती शिवरायांची भूमिका

Ajinkya Raut Play Role of Chhatrapati Shivaji Maharaj: छोट्या पडद्यावरचा अभिनेता झळकणार रुपेरी पडद्यावर; साकारणार छत्रपती शिवरायांची भूमिका
By : | Updated at : 29 Oct 2025 03:02 PM (IST)

Ajinkya Raut Play Role of Chhatrapati Shivaji Maharaj:काही प्रतिभावान कलावंतांनी कठोर मेहनतीच्या बळावर इतिहासाच्या पानांमधील व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावरही अजरामर केल्या आहेत. त्यांचीच परंपरा पुढे सुरू ठेवत आता अभिनेता अजिंक्य राऊत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व्यक्तीरेखेत दिसणार आहे. झी मराठीच्या (Zee Marati) मन उडू उडू झालंय मालिकेत दिसलेला अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आगामी सिनेमा 'अभंग तुकाराम'मध्ये (Abhanga Tukaram) तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. अजिंक्यनं विविध मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं असून त्याला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं.

या नव्या भूमिकेविषयी विषयी सांगताना अजिंक्य राऊत म्हणाला की, आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणं, हे मी भाग्यचं समजतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणं माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. ही व्यक्तिरेखा साकारताना जबाबदारीच भान असावं लागतं. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण टीमने ही मला उत्त्तम सहकार्य केलं आहे. तुकारामांच्या अभंगांमध्ये अध्यात्मिकतेचा साक्षात्कार आणि जीवनाची अर्थपूर्णता याचं अत्यंत सुंदर सार दडलेलं आहे.

हेच सार 'अभंग तुकाराम' या चित्रपटातून आपल्या समोर मांडण्यात येणार आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे असून, दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाचे छायांकन संदीप शिंदे यांचे आहे. संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा सौरभ कांबळे यांची आहे.

संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. ध्वनी आरेखन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर यांचे आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे तर कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. निर्मिती पश्चात प्रक्रिया सचिन भिल्लारे यांची आहे.

व्ही एफ. एक्स ची जबाबदारी शॉक अँड ऑ फिल्म्स यांनी तर व्हिजुअल प्रमोशनची जबाबदारी कॅटलिस्ट क्रिएटस यांनी सांभाळली आहे. सिनेमन एंटरटेनमेंटचे जय गोटेचा मार्केटिंग डायरेक्टर आहेत. कार्यकारी निर्मात्या केतकी गद्रे अभ्यंकर आहेत. दरम्यान, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'अभंग तुकाराम' चित्रपट 7 नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे.

पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, अजय अशोक पूरकर, दिग्पाल लांजेकर असून सहनिर्माते मुरलीधर छतवानी, रवींद्र औटी आहेत. महत्त्वाच्या इतर बातम्या :.

📚 Related News