Web Series Gullak IMDb Rating 9.1: 30 लाखांत बनलेली 'ही' वेब सीरिज, सांगते मिडल क्लास इमोशंस; IMDb वर रेटिंग 9.1, 'पंचायत' पेक्षाही ठरते सरस

Web Series Gullak IMDb Rating 9.1: 30 लाखांत बनलेली 'ही' वेब सीरिज, सांगते मिडल क्लास इमोशंस; IMDb वर रेटिंग 9.1, 'पंचायत' पेक्षाही ठरते सरस
By : | Updated at : 29 Oct 2025 02:24 PM (IST)

Web Series Gullak IMDb Rating 9. 1:ओटीटीमुळे (OTT Released) मनोरंजन फार सोपं झालंय, म्हणजे अगदी आपल्या हातात आलंय. आपण कधीही, कुठेही आपल्याला हवी असलेली वेब सीरिज, सिनेमा पाहू शकतो. सध्या सस्पेन्स थ्रीलर, क्राईम जॉनर असलेल्या सिनेमांची चर्चा जास्त रंगते. पण, असाही ऑडियन्स आहे, ज्यांना अगदी हलक्या-फुलक्या, रोजच्या जीवनावर आधारित असलेल्या वेब सीरिज (Web Series) पाहायला खूप आवडतात.

याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर, 'पंचायत' (Panchayat) वेब सीरिज, गावातलं राजकारण, तिथली लोकं, वातावरण यावर आधारित असलेली ही वेब सीरिज खूप गाजली. लोक 'पंचायत'च्या पुढच्या सीझनची आतुरतेनं वाट पाहत आहेत. पण, आज आम्ही तुम्हाला एका अशा वेब सीरिजबाबत सांगणार आहोत, जी 'पंचायत'च्या दोन पावलं पुढेच आहे. या सीरिज पाहताना तुम्हाला तुमच्यासोबत घडलेल्या अनेक घटनांची आठवण करून देईल. त्यासोबतच निखळ मनोरंजनही करेन.

एका छोट्याशा शहरात राहणारं एक कुटुंब. मिडल क्लास इमोशन्स आणि देशी ह्यूमर असलेली ही सीरिज तुम्हाला खिळवून ठेवते. या सीरिजमध्ये तुम्हाला कोणतीही तगडी स्टारकास्ट दिसणार नाही. पण, ज्यांनी या सीरिजमध्ये काम केलंय, ते तुम्हाला तुमच्यातलेच एक वाटतील. 'पंचायत' सारख्या हिट वेब सीरिज टक्कर देणारी ही सीरिज अत्यंत कमी बजेटमध्ये बनली आहे.

पण, लो बजेट असूनही या सीरिजनं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि यशही मिळवलं. या सीरिजला IMDb वर 9. 1चं धमाकेदार रेटिंग मिळालंय. प्रत्येक घरात 'गुल्लक' असतंच. आम्ही ज्या सीरिजबाबत बोलतोय, तिचं नाव 'गुल्लक'.

या सीरिजमध्ये एका छोट्याशा मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. संतोष मिश्रा, त्याची पत्नी शांती, मोठा मुलगा अनु आणि धाकटा मुलगा अमन या चौघांच्या कुटुंबाच्या दैनंदिन जीवनातल्या समस्या आणि त्यांच्यावर येणारी संकट यावर आधारित ही सीरिज आहे. वीज बिल, मुलांचे करिअर, शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या गप्पागोष्टी आणि त्यादरम्यान होणाऱ्या गमतीजमती तुमचं मन जिंकतात. ही सीरिज फक्त 'पंचायत' नाहीतर, 'पिचर्स', 'अ‍ॅस्पिरंट्स' आणि 'कोटा फॅक्टरी' सारख्या दमदार सीरिजसाठी ओळखल्या जाणाऱ्या TVF द्वारे निर्मित केली आहे. गुल्लकची निर्मिती श्रेयांश पांडे यांनी केली आहे.

आणि त्यातील पात्र जमील खान, गीतांजली कुलकर्णी, वैभव राज गुप्ता, हर्ष मयार आणि सुनीता राजवार यांनी साकारली आहेत. एकत्रितपणे, ते अशी जादू निर्माण करतात की, तुम्ही एखादा कार्यक्रम पाहत आहात असं वाटत नाही. कमी बजेट, पण दमदार स्टोरीलाईन फक्त 30 लाखांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'गुल्लक' सीरिजमधला साधेपणा ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. कोणताही बडेजाव नाही, ना मोठे सेट. फक्त दमदार, थेट आपलीशी वाटणारी कथा आणि डायलॉग्जच्या जीवावर ही सीरिज मन जिंकते.

आतापर्यंत या सीरिजचे चार सीझन्स प्रदर्शित झालेत. IMDb वर 9. 1 रेटिंगसह 'गुल्लक'नं 'पंचायत' आणि 'टू-व्हीलर'सारख्या सीरिजना मागे टाकलं आहे. महत्त्वाच्या इतर बातम्या :.

📚 Related News