Bacchu Kadu Farmer Protest :चर्चेची आमची तयारी आहे. आम्ही काय फक्त आंदोलन करायला आलेलो नाही असे मत नागपुरात महाएल्गार मोर्चा घेऊन आलेले बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वाखाली मध्ये (Nagpur) शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) अधिक तीव्र झाले असून, महामार्ग रोखल्यानंतर आता 'रेल रोको'चा (Rail Roko) इशारा देण्यात आला आहे. 'सरकारला शेतकऱ्यांना रस्त्यावर गोळ्या घालून मारायचं असेल तर आम्ही गोळ्याही खायला तयार आहोत,' असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. आम्ही चर्चेची दारे बंद केलेली नाहीत, पण सरकारनेच ती बंद केली आहेत, असेही ते म्हणाले.
आंदोलनाच्या दिवशीच त बैठकीसाठी बोलावणे हा अटक करण्याचा भाजपचा (BJP) डाव होता, असा गंभीर आरोपही कडू यांनी केला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही आणि हे आंदोलन संपूर्ण भर पसरेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. Bacchu Kadu :जशी एका पोराची आपल्या मायबापाकडून अपेक्षा असते, तशीच आमची जशी एका पोराची आपल्या मायबापाकडून अपेक्षा असते, तशीच आमची ही सरकारकडून अपेक्षा आहे. फक्त होणाऱ्या चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे. शेतकरी हिताचा निर्णय झाला पाहिजे असंही बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, आमच्यापर्यंत सरकारकडून चर्चेचा कुठलाही निरोप आलेला नाही, निरोप आला तर आम्ही चर्चा करू. आम्ही फक्त आंदोलन करण्यासाठी नाही, तर मार्ग काढायला इथे आलो आहोत असेही बच्चू कडू म्हणाले. सरकारचा विशिष्ट मंत्री किंवा विशिष्ट व्यक्तीच चर्चेसाठी यावं अशी आमची अट नाही. कोणताही प्रतिनिधी चर्चेसाठी आलं तर आम्हाला चालतंय, फक्त शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय करा. चर्चेनंतर निर्णय मात्र झाला पाहिजे, नाहीतर आम्हीही आंदोलन थांबवणार नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.
Dattatreya Bharane on Farmers Protest:शेतकऱ्याला पाठिंबा देणे ही आमची पहिली भूमिका आणि कर्तव्य दरम्यान याच मुद्दयांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क मंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatreya Bharane) म्हणाले कि, काल मुख्यमंत्री यांच्याशी बैठक झाली असून यातून नक्की मार्ग निघेल. योग्य निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. शेतकऱ्याकडे आमचं दुर्लक्ष नाही. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना आधार देणे आणि मदत कशी होईल याचा प्रयत्न आमचा चालू आहे. बच्चू भाऊ आमचे आहेत.
शेवटी नक्की त्यांच्या भावना आहेत, शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्याला पाठिंबा देणे ही आमची पहिली भूमिका आणि कर्तव्य आहे. बच्चू भाऊ यांच्या मागणीवर सरकार सकारात्मक आहे. महसूलमंत्री बावनकुळे हे आमचे वरिष्ठ मंत्री आहेत. ते लक्ष ठेऊन आहेत.
ते चर्चा करत आहेत, लवकरच तोडगा निघेल. अतिवृष्टीमुळे माझ्या शेतकऱ्यांचे नुकसान झालंय. निसर्गाच्या पुढे आपलं काही चालत नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. असेही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.
बच्चू कडू यांच्या 8 मोठ्या मागण्या:1) शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी जाहीर करावी. 2) कृषी मालाला हमी भावावर (MSP) 20% अनुदान देण्यात यावे. 3) शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाला समान निकष लाऊन 5 लाख रु. अनुदान द्यावे. 4) पेरणी ते कापणीचा सर्व खर्च MREGS मधुन करावा.
5) नागपुर - गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा. 6) दिव्यांग, निराधार, विधवा भगिनी व अनाथांना मासिक 6 हजार रुपये मानधन मिळावे-7) मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे8) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावावा. ही बातमी वाचा:.







