Baby Born in November 2025 :दिनदर्शिकेप्रमाणे, नोव्हेंबर महिना अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवीन महिना म्हटला की नवी आशा, नवी उमेद आणि कुतूहल आपसूकच निर्माण असो. अशा वेळी नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव, त्यांची रास, आरोग्य आणि वैवाहिक जीवन यांविषयी ज्योतिष आणि अंकशास्त्रानुसार माहिती डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी दिली आहे. ती सविस्तरपणे जाणून घेऊयात.
रास (Zodiac Sign) नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांची रास त्यांच्या जन्मतारखेनुसार बदलते :1 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान जन्मलेले लोक:वृश्चिक राशीचे असतात. 22 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान जन्मलेले लोक:धनु राशीचे असतात. स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व :नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक अत्यंत खास आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाचे असतात. त्यांचे काही प्रमुख गुण खालीलप्रमाणे आहेत:कल्पनाशक्ती आणि महत्त्वाकांक्षा :यांची कल्पनाशक्ती अफाट असते आणि त्यांची महत्त्वाकांक्षा खूप मोठी असते. ते ध्येयवादी आणि परिश्रमी असतात.
आत्मविश्वास आणि दूरदृष्टी :हे लोक दूरदर्शी असतात आणि त्यांना स्वतःच्या मेहनतीवर खूप विश्वास असतो. ते कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाहीत. प्रामाणिक आणि स्पष्टवक्ते :हे लोक प्रामाणिक आणि सत्यवादी असतात. त्यांना खोटं बोलणारे लोक आवडत नाहीत आणि आपले मत स्पष्टपणे मांडण्यास ते समर्थ असतात. आकर्षण आणि गोपनीयता :त्यांच्यात एक वेगळं आकर्षण असतं आणि ते लोकांना स्वतःकडे खेचण्याची कला घेऊन जन्माला येतात.
त्यांना गोपनीयता आवडते आणि ते आपले मित्र मर्यादित ठेवतात. संवेदनशील आणि रागीट :ते खूप संवेदनशील लेखक, कलाकार किंवा पत्रकार होऊ शकतात. त्यांचा स्वभाव शांत आणि सौम्य असला तरी त्यांना लवकर राग येतो आणि त्यांना रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज असते. निस्वार्थी :हे लोक जगाचे भले करण्यासाठी जन्माला आलेले असतात आणि दुसऱ्याच्या सुखासाठी आपले जीवन समर्पित करतात. आरोग्य :आरोग्याच्या बाबतीत, नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे:तणाव आणि रक्तदाब :रागावर नियंत्रण न ठेवल्यास किंवा जास्त ताणामुळे त्यांना रक्तदाबासारख्या (Blood Pressure) आजारांना लवकर बळी पडावे लागते.
केसांची काळजी :ज्योतिषशास्त्रानुसार, त्यांनी केसांची विशेष काळजी घ्यावी, अन्यथा टक्कल पडण्याची शक्यता असते. एकूण आरोग्य :त्यांना मानसिक शांतता आणि शारीरिक आरोग्य दोन्हीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. वैवाहिक आणि प्रेम जीवन :या लोकांचे वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंध बऱ्याचदा चांगले असतात:उत्तम जोडीदार :हे लोक खूप रोमँटिक असतात आणि उत्तम जीवनसाथी ठरतात. ते प्रेमासाठी काहीही करू शकतात आणि त्यांचे प्रेम संबंध तीव्र (Intense) आणि मनोरंजक असतात. नात्यात विश्वास :हे लोक नात्यांमध्ये खूप विश्वासू असतात.
ते ज्यांच्याशी आयुष्यभराचे नाते ठेवतात, ते पूर्णपणे निभावतात. समर्पण :हे आपल्या जोडीदारासाठी सर्वस्व अर्पण करतात. मात्र, तेवढं प्रेम परत न मिळाल्यास त्यांना अस्वस्थता जाणवते. शांत आणि दयाळू : शांत, दयाळू आणि सौम्य स्वभावामुळे ते जवळच्या नातेसंबंधांवर विश्वास ठेवतात, ज्यामुळे त्यांना आनंद मिळतो. - डॉ.
भूषण ज्योतिर्विद.








