Australia Women vs India Women, 2nd Semi-Final :महिला विश्वचषक 2025 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले आहेत. नवी च्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार एलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया हा सध्याचा विजेता आणि स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे, तर टीम इंडिया पहिल्यांदाच विश्वविजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करत आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया खेळाडू काळी पट्टी बांधून उतरल्या मैदानात (Why Players Wore Black Armbands During Ind vs Aus Semi Final) भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूंनी सामन्यादरम्यान आपल्या हातावर काळी पट्टी बांधली आहे. ही पट्टी ऑस्ट्रेलियाच्या युवा क्रिकेटपटू बेन ऑस्टिन याला श्रद्धांजली म्हणून बांधण्यात आली आहे. फक्त 17 वर्षांच्या ऑस्टिनचा सरावादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. बेन ऑस्टिन मंगळवारी आपल्या क्लबच्या नेट्समध्ये ऑटोमॅटिक बॉलिंग मशीनसमोर फलंदाजीचा सराव करत होता. त्याने हेल्मेट घातलेले असले तरी चेंडू त्याच्या मानेजवळ लागला.
तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान बुधवारी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही संघांनी काळी पट्टी बांधून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शेफाली वर्माचं टीम इंडियामध्ये पुनरागमन उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी शेफाली वर्मा हिची भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात कर्णधार एलिसा हिलीची पुनरागमन झाली असून सोफी मोलिनॉक्स हिला जॉर्जिया वेयरहॅमच्या जागी संधी मिळाली आहे.
भारतीय संघात दुखापतग्रस्त प्रतिका रावलच्या ऐवजी शेफालीला स्थान देण्यात आले आहे. शेफालीने यापूर्वीचा एकदिवसीय सामना 29 ऑक्टोबर 2024 रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. हरलीन देओल आणि उमा छेत्री यांना संघाबाहेर करण्यात आले असून त्यांच्या जागी क्रांती गौड आणि ऋचा घोष यांनी पुनरागमन केले आहे. भारतीय महिला संघाची प्लेइंग-11 :शफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंह ठाकूर. ऑस्ट्रेलिया महिला संघाची प्लेइंग-11 :फोबी लिचफिल्ड, एलिसा हीली, एलिस पेरी, बेथ मूनी, अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट.
IND vs SA 2nd Test : क्रिकेटची 148 वर्षांची परंपरा मोडली; भारत–दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत मोठा बदल! नेमकं काय घडलं?.







