IND vs AUS Semi Final World Cup Reserve Day Rule :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला एकदिवसीय विश्वचषक 2025चा उपांत्य सामना (IND vs AUS Women’s World Cup 2025 Semi-Final) नवी मुंबईत खेळला जाणार आहे. सध्या मुंबईत पावसाचे वातावरण आहे आणि त्यामुळे हवामान सतत बदलत आहे. नुकताच त भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेला गट सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता दुसरा उपांत्य सामना देखील त्याच मैदानावर होणार आहे. अशा परिस्थितीत पावसाचा अडथळा आला, तरी सामना थांबणार नाही कारण त्यासाठी रिझर्व डे म्हणजेच राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
पण प्रश्न असा आहे की, जर सामना पावसामुळे खेळवला गेला नाही, तर भारत थेट स्पर्धेतून बाहेर पडेल का? आणि मग अंतिम फेरीत भारत खेळेल की ऑस्ट्रेलिया? जर 30 ऑक्टोबरला सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही, तर तो 31 ऑक्टोबरला खेळवला जाईल. पण जर त्या दिवशीदेखील पाऊस झाला आणि सामना रद्द झाला, तर ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत प्रवेश करेल, कारण गट टप्प्यात ती भारतापेक्षा वरच्या स्थानावर होती. नियम 1 :सामना मूळ दिवशीच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. गरज पडल्यास ओव्हर्स कमी केले जातील. नियम 2 :जर उपांत्य सामन्यात पावसामुळे ओव्हर्स कमी करावे लागले, आणि सामना पुढच्या दिवशी हलवला गेला, तर सामना पुन्हा सुरू झाल्यावर तो 50 ओव्हर्सचा मानला जाईल.
नियम 3 :जर सामना दोनदा पावसामुळे थांबवला गेला, तर पहिल्यांदा जे ओव्हर्स कमी झाले होते, त्याच गणती पुढच्या दिवशी लागू राहील. निकालासाठी किमान 20 ओव्हर्स प्रति संघ खेळणे आवश्यक आहे. नियम 4 : जर रिझर्व डेवरही सामना रद्द झाला, तर गट टप्प्यातील गुणतालिकेत वर असलेला संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. हवामानाचा अंदाज त गुरुवारी सकाळी पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळी सुमारे 7 वाजेपर्यंत विजांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
AccuWeather च्या मते, सकाळी काही भागात हलका पाऊस होऊ शकतो, पण नंतर हवामान सुधारेल. सकाळी पावसाची शक्यता सुमारे 55% असून, दुपारपर्यंत ती कमी होऊन हवामान खेळासाठी अनुकूल होईल. दुपारी 3 वाजता सामना सुरू होईपर्यंत फक्त 20% पावसाची शक्यता राहील, तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ती 4% पर्यंत जाईल. त्यामुळे सामना सुरळीत पार पडण्याची पूर्ण शक्यता आहे. हे ही वाचा -.







