Shreyas Iyer Injury Update : बरगड्यांना मार, अंतर्गत रक्तस्राव, मग थेट ICU मध्ये! दुखापतीनंतर सिडनीतून श्रेयस अय्यरचा पहिला मेसेज; काय काय म्हणाला?

Shreyas Iyer Injury Update : बरगड्यांना मार, अंतर्गत रक्तस्राव, मग थेट ICU मध्ये! दुखापतीनंतर सिडनीतून श्रेयस अय्यरचा पहिला मेसेज; काय काय म्हणाला?
By : | Updated at : 30 Oct 2025 12:30 PM (IST)

Shreyas Iyer Injury Update : ऑस्ट्रेलियातून भारतासाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. गुरुवारी (30 ऑक्टोबर) सकाळी श्रेयस अय्यरने स्वतः त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात एलेक्स केरीचा झेल घेताना श्रेयसच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखम इतकी गंभीर होती की काही काळासाठी त्याला अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनीही सुरुवातीला परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले होते. मात्र आता श्रेयसची प्रकृती सुधारत असून तो बरा होत आहे. त्याने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले की, माझी प्रकृती सध्या सुधारत असून प्रत्येक दिवशी मी आणखी तंदुरुस्त होत आहे. या काळात सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि पाठिंब्यासाठी मी अत्यंत ऋणी आहे.

तिसऱ्या वनडे सामन्यात हर्षित राणाच्या चेंडूवर एलेक्स केरीचा झेल घेण्याच्या प्रयत्नात श्रेयसला बरगडीवर मार बसला. तो फिजिओच्या मदतीने मैदानाबाहेर गेला, परंतु काही वेळानंतर त्याची तब्येत अचानक बिघडली. शरीराचे तापमान, पल्स रेट आणि रक्तदाब अनियंत्रित झाले. तातडीने त्याला सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत प्लीहा (Spleen) फाटल्याचे आढळले आणि त्यामुळे अंतर्गत रक्तस्राव (Internal bleeding) होत होता.

म्हणूनच डॉक्टरांनी त्याला ICU मध्ये ठेवून सतत निरीक्षणाखाली ठेवले. बीसीसीआय काय सांगितले? भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दिलेल्या निवेदनात सांगितले की, श्रेयसची स्थिती आता स्थिर आहे. “दुखापत लागल्याबरोबर उपचार सुरू करण्यात आले आणि रक्तस्राव लगेच थांबवण्यात आला. 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या पुनर्तपासणीतही चांगली सुधारणा दिसून आली आहे. श्रेयस आता सावरत आहे.

बीसीसीआयची मेडिकल टीम सिडनी आणि भारतातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे,” असे बोर्डने म्हटले. थोडक्यात, श्रेयस अय्यर आता लवकरच पूर्णपणे बरा होईल, अशी खात्री डॉक्टर आणि संघ व्यवस्थापनाने दिली आहे.

📚 Related News