Vastu Tips :वास्तूशास्त्रानुसार, देवी लक्ष्मीला धनसंपत्तीची देवी मानलं जातं. देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा असावी असं प्रत्येकाला वाटतं. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भक्त अनेक उपाय करतात. वास्तूशास्त्रानुसार, घराच्या दक्षिण दिशेला या 5 वस्तू ठेवल्याने घरावर सदैव देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते. तसेच, श्रीमंतांच्या घरी तुम्हाला या वस्तू नक्कीच पाहायला मिळतील.
केरसुणी (Broom) मान्यतेनुसार, झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. वास्तूशास्त्रानुसार, घरातील केरसुणीला नेहमी दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावं. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. दागिने (Jwellery) आपल्या जवळच्या दागिन्यांना नेहमी घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावे. असं करणं शुभ मानलं जातं.
वास्तूशास्त्रानुसार, या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या वस्तू अनेक काळ आपल्याकडे टिकून राहतात. फिनिक्स पक्षी (Phoenix Bird) वास्तूशास्त्रानुसार, लिविंग रुमच्या दक्षिण दिशेच्या भिंतीवर फिनिक्स पक्ष्याचा फोटो लावावा. असे केल्यास घरात सकारात्मकता टिकून राहते. तसेच, घरात आनंदही टिकून राहतो. पलंगाची दिशा (Bed Side) वास्तूशास्त्रानुसार, घरातील पलंगाची दिशा नेहमी दक्षिण दिशेला असावी.
यामुळे आपल्या आयुष्यात सकारात्मकता येते. तसेच, देवी लक्ष्मीची देखील विशेष कृपा राहते. पूर्वजांचा फोटो (Photo of ancestors) घरात जर पूर्वजांचे फोटो असतील तर त्याची दिशा नेहमी दक्षिण पूर्व दिशेचा भिंतीवर असावी. यामुळे पितरांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतो. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.
यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ).








