Numerology Of Mulank 4 :वैदिक शास्त्रात राहू ग्रहाला कठोर वाणी, जुगार, प्रवास, दुष्ट कर्म आणि त्वचेचा कारक ग्रह मानण्यात आलं आहे. अंकशास्त्रानुसार, राहू ग्रह हा मूलांक 4 चा स्वामी ग्रह आहे. याचाच अर्थ ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक 4 असतो. या मूलांकाचे लोक फार क्रिएटिव्ह आणि दूरदर्शी असतात. त्याचबरोबर, राजकारणात या लोकांना चांगलं यश मिळतं.
शेअर बाजार, सट्टा, लॉटरी यांसारख्या व्यवहारात त्यांना चांगले पैसे मिळतात. त्यानुसार, मूलांक 4 विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात. प्रॅक्टिकल आणि क्रिएटिव्ह असतात अंकशास्त्रानुसार, ज्या जन्मतारखेच्या लोकांचा मूलांक 4 असतो असे लोक फार प्रॅक्टिकल स्वभावाचे असतात. तसेच, थोडेफार इमोशनल स्वभावाचे देखील असतात. रचनात्मक गोष्टी करण्यात यांना फार मजा येते.
तसेच, विज्ञान किंवा राजकारणात देखील यांची रुची पाहायला मिळते. विशेष म्हणजे, या जन्मतारखेचे लोक प्रत्येक विषयाची माहिती ठेवतात. थोडेफार मनमौजी स्वभावाचे असतात. तसेच, हाती घेतलेलं कार्य वेळेत पूर्ण करण्याची यांची विशेष सवय असते. मनमौजी असतो स्वभाव मूलांक 4 असणारे लोक प्रत्येक गोष्ट आपल्या विचाराने करतात.
त्यांना इतरांवर अवलंबून राहायला आवडत नाही. तसेच, जर यांना कोणी काही सल्ला दिला तर तो त्यांना घ्यायलाही आवडत नाही. यांना एकटेपणा जास्त आवडतो. पण, जेव्हा हे लोक मित्रांच्या संगतीत असतात तेव्हा मैफिलीची शान असतात. मूलांक 7 हा केतू ग्रहाशी जोडण्यात आला आहे.
त्यामुळे मूलांक 4 आणि मूलांक 7 असणाऱ्या लोकांचं विशेष पटतं. तर, मूलांक 4 असणाऱ्या लोकांचं मूलांक 2 आणि 8 असणाऱ्या लोकांशी जास्त पटत नाही. इतरांमध्ये जास्त गुंतत नाहीत या जन्मतारखेचे लोक फार प्रॅक्टिकल असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत इमोशनल राहायला यांना काहीसं जमत नाही. आणि याच कारणामुळे या जन्मतारखेचे लोक कोणत्याही नात्यात जास्त गुंतत नाहीत. मात्र, आपल्या अस्तित्वाने ते इतरांना लगेच आकर्षित करतात.
इतरांच्या मनात या जन्मतारखेचे लोक लगेच आपली जागा निर्माण करतात. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ).







