Lucky Zodiac Signs On 30 October 2025 :ज्योतिषशास्त्रानुसार, उद्या 30 ऑक्टोबरचा दिवस आहे. हा दिवस दत्तगुरुंनासमर्पित आहे. तसेच, शुक्र ग्रहाच्या संक्रमणाचा देखील अनेक राशींवर परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी कोणकोणत्या राशींवर दत्तगुरुंची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. तसेच, उद्याचा दिवस कोणत्या राशींसाठी भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope) मेष राशीसाठी उद्याचा दिवस फार शुभकारक असणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचे संकेत मिळू शकतात. तसेच, तुमचे विरोधक तुमच्या कामात अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील पण तुम्हाला ठाम राहून त्याचा सामना करावा लागेल. गरजू व्यक्ती तुम्हाला भेटू शकतात. अशा वेळी दानधर्म पुण्याचं काम करणं लाभदायी ठरेल, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशांची बरकत राहील.
मिथुन रास (Gemini Horoscope) मिथुन राशीसाठी उद्याचा दिवस फार खास असणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या विविध संधी निर्माण होतील. तसेच, तुमची ठरवलेली कामे वेळेत पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मार्गातील अडथळे दूर होतील. लवकरच सुखाचे वारे वाहतील.
मित्रांचा सहभाग तुमच्यासाठी मोलाच ठरेल. सिंह रास (Leo Horoscope) सिंह राशीच्या लोकांची दिवसाची सुरुवातच सकारात्मक होईल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. विचारांमध्ये सकारात्मकता जाणवेल. तसेच, हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल.
नको त्या लोकांपासून आताच अंतर ठेवा. कोणाबद्दलही वाईट विचार मनात ठेवू नका. वृश्चिक रास (Scorpio Horoscope) वृश्चिक राशीला भाग्याची साथ मिळणार. तुमची नियोजित कामे तुम्हाला वेळेत करता येतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील.
धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, दान धर्म आणि पुण्याचं काम करत राहा. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा राहील. मीन रास (Pisces Horoscope) मीन राशीच्या लोकांचा उद्याचा दिवस लाभदायी असणार आहे. तुमचा दिवस अनुकूल असेल.
दिवसाची सुरुवात सकारात्मक होईल. तसेच, काही कारणास्तव तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. अशा वेळी पैशांचा जपून वापर करा. तसेच, प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.
यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ).








