Vastu Tips :आपल्या सर्वांनाच माहीत आहे की वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. तुमची वेळ चांगली असो वा वाईट सर्वात चांगली गोष्ट म्हणजे वेळ आपल्या गतीने पुढे जात असते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चांगली आणि वाईट वेळ ही येतेच. वाईट वेळ ही माणसाला दु:ख,वेदना देऊन चांगली शिकवण देऊन जाते. तर, चांगली वेळ व्यक्तीच्या आयुष्यात सुख-शांती आणि पैशांची भरभराट घेऊन येते.
जेव्हा आपल्या आयुष्यात मोठा बदल होणार असतो तर अशा वेळी सृष्टीकडून, देवाने काही संकेत दिलेले असतात अशी मान्यता आहे. या संकेतांमधून आपल्याला चांगलं होणार आहे की वाईट याची अनुभूती करता येते. या संकेतामधून आपल्या विचारसरणीत देखील फरक पडतो. अशा वेळी व्यक्तीची चांगली वेळ येण्याआधी कोणते संकेत मिळतात ते जाणून घेऊयात. घरात शुभवार्ता समजणे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ सुरु होणार असतो तेव्हा त्याला काही चांगले संकेत मिळतात.
जसे की, झाडांची पानं हलणं, दिव्याचं सेवत राहणं, घरात आनंदी वातावरण निर्माण होणं. या सर्व संकेतांचा अर्थ म्हणजे आपली चांगली वेळ सुरु होणार आहे. डाव्या डोळ्यांची पापणी फडफडणं जर पुरुषांचा डावा डोळा फडफडत असेल तर समजून जा की तुमच्या जीवनात काही सकारात्मक बदल घडणार आहेत. याऊलट, महिलांचा उजवा डोळा फडफडत असेल तर काही शुभवार्ता मिळणार आहे असा होतो. ब्रह्म मुहूर्तावर जाग येणे आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत ज्यांना वेळेआधीच जाग येते.
जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर म्हणजेच पहाटे तीन ते पाच वाडेच्या दरम्यान जाग येत असेल तर हा फार अद्भूत संकेत आहे. जर तुमच्याबरोबर देखील हा प्रकार होत असेल तर तुमची चांगली वेळ सुरु होणार हा संकेत आहे. स्वप्नात मंत्रांचा आवाज ऐकू येणं जर तुम्हाला स्वप्नात मंत्र ऐकू येत असतील तर धार्मिक कार्यात तुमची रुची वाढण्याचा हा संकेत आहे. स्वप्नात जर गायत्री मंत्र तुम्हाला ऐकू येत असेल तर तुमच्यावर देवाची कृपा आहे. या व्यतिरिक्त स्वप्नात घंटा, शंख आणि पवित्र ध्वनी ऐकू येत असतील तर हा देखील शुभ संकेत आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ).








