Mumbai Children Hostage: 17 मुलं, 1 वयस्कर आणि 1 स्थानिक, 19 जणांना बंधक बनवलं, बंदूकधारी किडनॅपरला कसं पकडलं? पोलिसांनी थरारक माहिती सांगितली

Mumbai Children Hostage: 17 मुलं, 1 वयस्कर आणि 1 स्थानिक, 19 जणांना बंधक बनवलं, बंदूकधारी किडनॅपरला कसं पकडलं? पोलिसांनी थरारक माहिती सांगितली
By : | Edited By: परशराम पाटील | Updated at : 30 Oct 2025 04:49 PM (IST)

Mumbai Children Hostage: मुंबईमध्ये मुलांना ओलिस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. रोहित आर्य नावाच्या किडॅनपरने पवईमधील RA स्टुडिओमध्ये मुलांना ऑडिशन देण्याच्या नावाखाली एकत्र आलेल्या 25 ते 30 मुलांना बंदुकीचा धाक दाखवत ओलिस ठेवलं होतं. पवई पोलिसांनी तातडीने कारवाई करत या मुलांची सुखरूप सुटका केली. त्यामुळे पालकांचा जीव भांड्यात पडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही मुलं राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आली होती.

ऑडिशनच्या नावाखाली ही सर्व मुली स्टुडिओत आली होती. पोलिसांकडून 19 जणांची सुखरूप सुटका दरम्यान, पवई पोलिसांनी 19 जणांची सुखरूप सुटका केल्यानंतर पोलिस उपायुक्तांनी माहिती देताना सांगितले,. या कॉलनंतर पवई पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद देत घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बंधक ठेवणाऱ्या व्यक्तीशी बोलणे सुरू ठेवतानाच असं अन्य मार्गांनी मुलांची सुखरूप सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बाथरूम मधून पोलिसांनी एन्ट्री करत सर्व ओलिस ठेवलेल्यांची सुटका केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सुटका करण्यात आलेल्यांमध्ये 17 मुलांचा समावेश होता, तर एक ज्येष्ठ नागरिकांसह अन्य एक मिळून 19 जणांची सुटका करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका वेब सिरीजसाठी ऑडिशन घ्यायचं म्हणून या सर्वांना वेगवेगळ्या जिल्ह्यातून बोलावण्यात आलं होतं. नंतर त्यांनाच ओलिस ठेवण्यात आलं होतं. रोहित आर्यकडे एक एअर गन सापडल्याची सुद्धा माहिती आहे. स्टुडिओमध्ये केमिकल सुद्धा सापडल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी सर्वांची सूटका केल्यानंतर स्टुडिओमध्ये सर्च ऑपरेशन सुरु केलं. कोण आहे रोहित आर्य? रोहित आर्य हा मागील काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसला होता. त्याचे पैसे सरकारकडे आहेत. त्याने लोन काढून एक प्रोजेक्ट शिक्षण विभागासाठी केला होता. स्वच्छता मॉनिटरचे पैसे त्याला मिळाले नसल्याने कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे.

इतर महत्वाच्या बातम्या.

📚 Related News