Nilesh Ghaywal: निलेश घायवळचे मराठवाड्यातील पवनचक्की माफियाचे संबंध उघड; धाराशिवच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्याशी घायवळचे करोडो रुपयांचे व्यवहार

Nilesh Ghaywal: निलेश घायवळचे मराठवाड्यातील पवनचक्की माफियाचे संबंध उघड; धाराशिवच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्याशी घायवळचे करोडो रुपयांचे व्यवहार
By : | Edited By: Ankita Khane | Updated at : 30 Oct 2025 12:14 PM (IST)

पुणे:पुण्यातील गुंड निलेश घायवळचे मराठवाड्यातील (Nilesh Ghaywal) पवनचक्की माफियाचे संबंध उघडकीस आले आहेत. धाराशिव पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांशी घायवळचे आर्थिक व्यवहार असल्याचं समोर आलं आहे. अमोल लाखे असे या पवनचक्की माफियाचे (Nilesh Ghaywal) नाव आहे. घायवळ आणि लाखे यांच्यात करोडो रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. जुलै महिन्यात लाखे याने त्याच्या काही साथीदारांसह धाराशिव येथील पवनचक्की कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली होती.

(Nilesh Ghaywal) Nilesh Ghaywal:कर्ज मिळवून देतो आणि नोकरी लावतो सांगत मित्राची कागदपत्रे घेतली अन्. या प्रकरणात सुद्धा निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याचा संबंध असल्याचे सांगितलं जात आहे. मित्राच्या कागदपत्रांवर सिमकार्ड घेणाऱ्या लाखे यावर आता पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज मिळवून देतो आणि नोकरी लावतो असे सांगत मित्राचे कागदपत्रे घेत त्याआधारे घेतलेले सिमकार्ड घायवळ टोळीतील एका सदस्याने काही गुन्ह्यात वापरले असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा सर्व प्रकार उघडकीस आल्याने तरुणाने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

अमोल दत्तात्रेय लाखे (रा. ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सदस्याचे नाव आहे. Nilesh Ghaywal:तुला शेती आणि व्यवसायासाठी कर्ज काढून देतो कुख्यात गुंड नीलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने फिर्यादी यांना वारजे माळवाडी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. पोलिसांना चौकशीत समजले की, फिर्यादी यांच्या नावावर असलेला मोबाईल क्रमांक लाखे वापरत आहे. लाखे याने फिर्यादी यांच्या कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड घेतले आहे.

तो नंबर काही बँक खात्यांशी संलग्न करण्यात आला. फिर्यादी आणि लाखे मित्र आहेत. २०१९ मध्ये लाखे याने फिर्यादी यांना ‘मी तुला शेती आणि व्यवसायासाठी कर्ज काढून देतो. पुण्यात माझ्या ओळखी आहेत. तू कागदपत्रे घेऊन ये.

तुझ्या नोकरीबद्दल मी माझा मित्र निलेश घायवळ याला बोललो आहे. ते देखील तुला सांगतो,’ असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी त्यांची कागदपत्रे लाखे याला दिले. लाखेने फिर्यादी यांच्या कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड घेऊन ते काही गुन्ह्यात वापरले आहे, याप्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. Nilesh Ghaywal: निलेश घायवळचं लंडनमधील लोकेशन सापडलं निलेश घायवळ परदेशात आहे, त्याचा पासपोर्ट देखील रद्द करण्यात आला आहे, तर युके सरकारला त्याबाबत लिहून त्याचा शोध घ्यावा अशी मागणी केली होती, त्याप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश घायवळ हा लंडनमध्येच आहे. युके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना उत्तर देण्यात आलं आहे. ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निलेश घायवळ याचा व्हिसा आहे. निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) हा त्याचा मुलगा लंडनमध्ये शिकत असल्याने तो लंडनमध्ये असल्याची युके हाय कमिशनकडून पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. युके हाय कमिशनने निलेश घायवळबाबत (Nilesh Ghaywal) तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांना कळवले असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे.

📚 Related News