जीममध्ये व्यायाम करताना अस्वस्थ वाटू लागले; पुण्यात अग्निशमन दलातील जवानाचा अकाली मृत्यू

जीममध्ये व्यायाम करताना अस्वस्थ वाटू लागले; पुण्यात अग्निशमन दलातील जवानाचा अकाली मृत्यू
By : | Updated at : 30 Oct 2025 01:47 PM (IST)

: अलिकडच्या काळात विविध आजार आणि तरुण वयातच ह्रदयविकाराच्या घटनांचं प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कधी जीममध्ये व्यायाम करताना, तर कधी क्रिकेटच्या मैदानावरच खाली कोसळून मृत्यू झाल्याच्याही दुर्दैवी घटना गडल्या आहेत. आता, शहरातील चोविसावाडी फायर स्टेशन येथे मंगळवारी सायंकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना 31 वर्षीय जवान राजेश रामभाऊ राऊत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा अकाली निधनाने अनेकांना धक्का बसला असून परिसरात शोककळा पसरली आहे. राजेश राऊत हे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फायर स्टेशनमधील जीममध्ये नेहमीप्रमाणे व्यायाम करत होते.

व्यायामादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने थोडावेळ आराम करण्यासाठी ते खाली आले. काही वेळानंतर सहकाऱ्यांनी पाहिले असता, ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यामुळे, जिममधील सहकाऱ्यांनी त्यांना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या दुःखद घटनेमुळे अग्निशमन दलातील त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील मुख्य अग्निशमन केंद्र येथे जवान राजेश यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी आज अखेरची सलामी दिली आहे. यावेळी, परिसरात शोककळा पसरली होती. हेही वाचा.

📚 Related News