1. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यासांठी बच्चू कडू, राजू शेट्टींसह समर्थकांचं आक्रमक आंदोलन, मात्र नागपुरातील ठिय्या आंदोलन स्थळावरुन बाजूला व्हावं, खंडपीठाचे आदेश, तर न्यायालयाचा अपमान नाही, पण लोकन्यायालयाचंही ऐकणार, बच्चू कडूंची भूमिका सरकारकडून चर्चेचे दरवाजे उघडेच, पण बच्चू कडू बैठकीला येतच नाहीत,चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य, सरकारकडून आशिष जयस्वाल बच्चू कडूंशी चर्चा करणार 2. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, 60 पेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाही, नव्या चेहऱ्यांना संधी देणार 'कोणाच्याही भरवशावर राहू नका, स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीसाठी तयार राहा,विनाकरण मुंबईत राहू नका,अजित पवारांची पक्षातील आमदारांना तंबी 3. डॉक्टर तरुणीच्या हातावरील आणि पत्रातील निरीक्षक शब्दाच्या वेलांटीकडे लक्ष वेधलं, सुषमा अंधारेंचा पत्रकार परिषदेतून नवा दावा, रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल फलटणमधील डॉक्टर तरुणीने जीवन संपवण्याआधी फोटो काढला, लटकवलेल्या ओढणीचा सेल्फी प्रशांत बनकरला पाठवल्याची सूत्रांची माहिती 4. मृत डॉक्टर तरुणीच्या मोबाईलमधील पुरावे डिलिट केले नाहीत, सायबर तज्ज्ञांकडून तपासणी सुरु, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषींची माहिती डॉक्टर तरुणीची हत्या नाही तर आत्महत्या,आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु,मधुदीप हॉटेलचे मालक दिलीप भोसले यांचा दावा 5.
लाडक्या बहिणींना शेवटची संधी,ई-केवायसीची मुदत 18 नोव्हेंबरला संपणार, त्यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंचं आवाहन 6. एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगरातील घरी चोरी, घरातून 'ती' सीडी अन् पेनड्राईव्ह गायब; नाथाभाऊंच्या दाव्याने खळबळ 7. पुण्यात एटीएसची कारवाई, उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर जुबेर हंगरगेकरला अटक, बॉम्ब तयार करण्याची माहिती असणारं पुस्तक सापडलं 8. भारतीय शेअर बाजारात तेजी सुरु, सेन्सेक्स 85 हजारांच्या उंबरठ्यावर, निफ्टी 26 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले 9. भारत पाकिस्तान संघर्षात सात नवीन आणि सुंदर विमानं पाडली गेली, भारत-पाक युद्ध थांबवल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दावा 10.
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी 20 सामना पावसामुळे रद्द, 31 ऑक्टोबरला खेळला जाणार दुसरा सामना वनडेचा राजा रोहित शर्मा,आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावले, शुभमन गिलला टाकले मागे एबीपी माझा स्पेशल Pandharpur Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीसाठी 10 लाख बुंदीच्या लाडवांचा प्रसाद तयार प्रियकराच्या साथीने कुंकूच पुसलं, पिंपरीतील थरारक हत्याकांड, नकुल भोईर प्रकरणाचा उलगडा एबीपी माझा Whatsapp Channel-.








