Phaltan Doctor Death: 'ती खूप पॅनिक दिसत होती, गाडीही आत...'; फलटणच्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

Phaltan Doctor Death: 'ती खूप पॅनिक दिसत होती, गाडीही आत...'; फलटणच्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
By : | Edited By: Rohit Dhamnaskar | Updated at : 29 Oct 2025 02:33 PM (IST)

Phaltan Doctor Death:फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या मृत्युमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. पोलीस अधिकारी गोपाळ बदने (Gopal Badne) आणि स्थानिक खासदाराच्या पीएने दबाव आणल्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे तरुणीने हातावरील सुसाईड नोटमध्ये (Suicide News) लिहून ठेवले होते. या तरुणीने फलटण येथील हॉटेल मधुदीपमधील (Hotel Madhudeep) एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हापासून हॉटेल मधुदीप प्रचंड चर्चेत आले होते. डॉक्टर तरुणीला या हॉटेलमध्ये बोलावून तिची हत्या करण्यात आली, असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता.

या पार्श्वभूमीवर बुधवारी मधुदीप हॉटेलचे मालक दिलीप भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. (Phaltan Doctor Suicide News) या प्रकरणात आमच्या हॉटेलला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. सुरुवातीला पोलिसांना ज्यावेळेस पोलिसांना बोलावले त्यावेळी पोलिसांनी यायला उशीर होत असल्यामुळे आम्ही वकिलांचा सल्ला घेऊन रुम उघडली. त्यानंतर पोलिसांना पाचरण केले असता पोलीस लगेच आले. ही हत्या नाही तर आत्महत्या आहे.

आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी गेली 30-35 वर्ष झाले सामाजिक कार्यात काम करतोय. चांगले निर्णय घेतले, त्याच्यामुळे काही लोक मला बदनाम करतात. आम्ही 23 ऑक्टोबरला मध्यरात्री दीड वाजता हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीला खोली दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता तिने कॉल केला होता, तोपर्यंत ती व्यवस्थित होती.

रात्री हॉटेलमध्ये चेक इन करताना तिने सांगितले होते की, मला सकाळी साडेनऊ वाजता बारामतीला जायचे आहे. परंतु दुसऱ्या दिवशी दुपारी वाजता संशय आला त्यावेळेस आम्ही वकिलांच्या सल्ल्यानुसार दरवाजा उघडला, त्यावेळेस तिने फास घेतलेला पाहायला मिळाले. त्यानंतर तात्काळ आम्ही पोलिसांना पाचारण केलं आणि पोलिसांना आम्ही सगळे सहकार्य केल्याचे दिलीप भोसले यांनी सांगितले. Satara News:डॉक्टर हॉटेलमध्ये आल्या तेव्हा खूप पॅनिक वाटत होत्या, नेमकं काय झालं? हॉटेल चालक म्हणून एखादा व्यक्ती इतक्या काळ खोलीत राहतो तर तुमची जबाबदारी नव्हती का, असा प्रश्न विचारला असता दिलीप भोसले यांनी म्हटले की, हो आमची जबाबदारी होती. मात्र, आम्हाला असं वाटलं की, रात्री उशिरा आल्यामुळे त्यांनी काही मागितले नसेल आणि नेमकी साडेबारा वाजता शिफ्ट चेंज झाली.

जेव्हा आम्हाला संशय आला त्यावेळेस आम्ही दार उघडले. ज्यावेळेस ती हॉटेलमध्ये आली त्यावेळेस सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला रुम दिली. तेव्हा नंतर कुणीच रुममधून बाहेर आलं नाही. दार वाजवले असता त्यांनी आतून प्रतिसाद दिला नाही. ज्यावेळेस डॉक्टर तरुणी हॉटेलमध्ये आली त्यावेळेस ती पॅनिक वाटत होती.

त्यांना गाडीदेखील आत घेता आली नाही. आमच्या वॉचमनने गाडी आतमध्ये घेतली. गेली 30-35 वर्षे झालं मी काम करतो आहे. त्याच्यामुळे विरोधक जाणुनबुजून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे ही हत्या नसून ही आत्महत्या आहे, असे हॉटेल मालक दिलीप भोसले यांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी घटनास्थळी येण्यास उशीर केल्याने रुम उघडली, हॉटेल मालकाचं स्पष्टीकरण, Video: आणखी वाचा.

📚 Related News