Phaltan Doctor Case Sushma Andhare:साताऱ्यातील फलटण मधील डॉक्टर तरुणीचा आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण हादरला आहे. याप्रकरणी दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात ही खळबळ उडालीय. मृत डॉक्टर तरुणीच्या हातावर सुसाईड नोट आढळून आली असून त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने संबंधित महिला डॉक्टरवर चार वेळा बलात्कार केल्याचा उल्लेख करण्यात आल्यानंतर या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत फलटणच्या डॉक्टर महिलेच्या मृत्यूप्रकरणी तरुणीच्या हातावरील वेलांटीकडे लक्ष वेधत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केलीय.
या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि जयश्री आगवणे (Jayshree Aagwane) यांच्याविरोधात 50 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. 'सुषमा अंधारे यांनी 48 तासांमध्ये माफी मागावी', अशी नोटीस निंबाळकरांनी त्यांना पाठवली आहे. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी या संपूर्ण विषयावरून एक पत्रकार परिषद घेतली. काय म्हणाल्या सुषमा अंधारे ? शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
त्या म्हणाल्या, “काल मला अजून एक हक्कभंगाची नोटीस आली आहे. ही नोटीस अनिल बोरनारे यांच्या सहीची असून, 50 कोटी रुपयांच्या दाव्याचीही नोटीस मला मिळाली आहे. या दोन्ही नोटीसा मी सहर्ष स्वीकारते. ” अंधारे म्हणाल्या, “आम्ही सीडीआरची (कॉल डिटेल रेकॉर्ड) मागणी केली आहे. काल भाजप प्रायोजित पत्रकार परिषद झाली आणि ती महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली.
मात्र, त्या महिलेचा सीडीआर सार्वजनिक करण्याचा पोलिसांना अधिकार कोणी दिला, हा आमचा प्रश्न आहे. महिला आयोगाने कोणत्या अधिकाराखाली असे वक्तव्य केले, हे त्यांनी स्पष्ट करावे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या व्यक्तीला पदावर ठेवावे की नाही, याचा विचार करावा. ” सुषमा अंधारेंनी वेलांटीवरून वेधलं लक्ष अंधारे पुढे म्हणाल्या, “चार पानी पत्रात ‘पोलीस निरीक्षक’ हा शब्द नऊ वेळा आला आहे. हे पत्र पाहिल्यावर लक्षात येते की त्यातील हस्ताक्षर आणि त्या महिलेच्या हातावर असलेली वेलांटी यामध्ये फरक आहे.
पत्रात लिहिलेली ‘वेलांटी’ दीर्घ आहे, तर तिच्या हातावरील वेलांटी वेगळी आहे. त्यामुळे ही आत्महत्या की हत्या, याबाबत शंका घेण्यास वाव आहे. हस्ताक्षरही जुळत नाही. ” त्या म्हणाल्या, “महिला आयोगाने या विषयावर अजून का काहीही बोलले नाही? त्यांनी सुपारी घेतली आहे का? कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? मी हस्ताक्षराचा अहवाल मागवला आहे आणि तो दोन दिवसांत मला मिळेल. ”त्या पुढे म्हणाल्या, “मृत्यूनंतर रात्री अकरा वाजता त्या महिलेने व्हॉट्सअॅप स्टेटस लाईक कसा केला? पोलिस सांगतात की आत्महत्या संध्याकाळी सात वाजता झाली.
मग हा वेळेचा फरक कसा? म्हणूनच आमचा संशय पोलिसांवर आहे. ” त्या म्हणाल्या, “नोटीसला उत्तर देण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. मला कुणी घाबरवू शकत नाही. कुणाच्या तोंडाला फडकं बांधण्याची गरज नाही. तुमचं लेकरू दोषी आहे.
”अंधारे म्हणाल्या, “हातावर लिहिलेलं जे आहे ते दुसऱ्या कोणी लिहिलं का, याची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समिती नेमावी. ” त्या पुढे म्हणाल्या, “३ नोव्हेंबर रोजी मी फलटण पोलिस स्टेशनला जाणार आहे. मुख्यमंत्री न्यायाधीशांच्या खुर्चीत बसू नयेत. जर मुख्यमंत्रीच न्यायाधीशाची भूमिका घेणार असतील, तर मग न्यायालयाची गरज काय आहे?” हस्ताक्षराचा अहवाल मागवला, कायदेशीर मार्गाने पुढे जाणार “हक्कभंगाच्या प्रस्तावा संदर्भात माझे स्पष्टीकरण मी दिले आहे.
काल मला पुन्हा हक्कभंगाची नोटीस आली, मात्र मी ती अद्याप स्वीकारलेली नाही. ५० कोटींच्या दाव्याची नोटीस देखील मला मिळाली आहे. मी महिला आयोगाबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते,” असे अंधारे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, “घटनास्थळावरील मुद्देमाल जप्त केला जातो आणि ती माहिती गोपनीय असते. केवळ न्यायालयासमोरच ती माहिती सादर केली जाते.
निंबाळकर आणि महाडीक यांचा इतरांशी संपर्क झाला का, याच्या सीडीआरची आमची मागणी होती. मात्र महिला आयोगाच्या सीडीआरविषयी त्या सार्वजनिकपणे बोलल्या. वैष्णवी हगवणे प्रकरणातही माझा हाच प्रश्न होता ,तिचे वडील तिचे सीडीआर कसे घेतात?” त्या म्हणाल्या, “या सर्व बाबींशी महिला आयोगाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने अशा बेजबाबदार व्यक्तीला पदावर ठेवावे का, याचा विचार करावा. राजकीय प्रेरित व्यक्तीचा सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा.
” अंधारे म्हणाल्या, “डॉक्टर महिलेने लिहिलेल्या पत्रात ‘निरीक्षक’ हा शब्द नऊ वेळा लिहिला आहे. त्यातील वेलांटी आणि तिच्या हातावरील वेलांटी यामध्ये फरक आहे. तिच्या चारित्र्याचे हनन करताना किमान माहिती तरी घ्यावी. या दोन्ही गोष्टींमुळे ही आत्महत्या की हत्या, याविषयीचा संशय आणखीन गडद झाला आहे. ” त्या पुढे म्हणाल्या, “कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हस्ताक्षराचा अहवाल मी मागवला असून, मी या प्रकरणात कायदेशीर मार्गाने पुढे जाणार आहे. ” अंधारे म्हणाल्या, “बहिण आणि भाऊ दोघे वेळेबाबत वेगवेगळं बोलत आहेत. बहिणीचा फोन पोलिसांनी उचलला होता. पोलिस सांगतात की आत्महत्या संध्याकाळी सात वाजता झाली, पण तिने रात्री अकरा वाजता बहिणीचा व्हॉट्सअॅप स्टेटस लाईक केला होता. मग वेळ चुकतेय का? म्हणूनच आमचा संशय पोलिसांवर आहे.
उच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समिती नेमावी. ” संपूर्ण PC पहा इथे:.








