Maharashtra Local Body Elections: होऊ दे खर्च! निवडणूक आयोगानं वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'! नगरसेवक, थेट नगराध्यक्ष किती लाखांनी खर्च वाढवला?

Maharashtra Local Body Elections: होऊ दे खर्च! निवडणूक आयोगानं वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'! नगरसेवक, थेट नगराध्यक्ष किती लाखांनी खर्च वाढवला?
By : | Edited By: परशराम पाटील | Updated at : 30 Oct 2025 10:08 AM (IST)

Maharashtra Local Body Elections:राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या (Municipal Election 2025 Maharashtra) निवडणूक खर्च मर्यादेत मोठी वाढ केली आहे. आधीच्या तुलनेत सुमारे दीडपट वाढ केल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे (Election Expense Limit Maharashtra) निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना प्रत्यक्ष निवडणूक प्रचारासाठी अधिक आर्थिक मोकळीक मिळणार आहे. यापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उमेदवारांसाठी सहा लाख रुपयांची आणि महापालिका निवडणुकांसाठी दहा लाख रुपयांची खर्च मर्यादा होती. मात्र, बदलत्या काळानुसार आणि वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही मर्यादा आता वाढवण्यात आली आहे.

महागाई, प्रचार साधनांचे दर, डिजिटल माध्यमांवरील खर्च आणि वाहनभाडे यांसारख्या बाबींचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. या नव्या निर्णयानुसार महापालिका नगरसेवकांसाठी पुढीलप्रमाणे खर्च मर्यादा लागू राहील. मुंबई, आणि महापालिका:₹15 लाख , आणि महापालिका:₹13 लाख कल्याण-डोंबिवली, , नवी , वसई-विरार:₹11 लाख ‘ड’ वर्गातील 19 महापालिका:₹9 लाख (Mahapalika Election 2025) तसेच, नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठीही नव्या खर्च मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. ‘अ’ वर्ग नगरपरिषद:नगरसेवक ₹5 लाख, थेट नगराध्यक्ष ₹15 लाख ‘ब’ वर्ग नगरपरिषद:नगरसेवक ₹3. 5 लाख, नगराध्यक्ष ₹11.

25 लाख ‘क’ वर्ग नगरपरिषद:नगरसेवक ₹2. 5 लाख, नगराध्यक्ष ₹7. 5 लाख नगरपंचायत: नगरसेवक ₹2. 25 लाख, नगराध्यक्ष ₹6 लाख या वाढीमुळे उमेदवारांना कायदेशीर चौकटीत राहून प्रभावी प्रचार करण्यास मदत होईल. तसेच निवडणुकीचा खर्च पारदर्शक, नियमनबद्ध आणि वास्तवाशी सुसंगत राहील, अशी चिन्हे आहेत.

ही सुधारित खर्च मर्यादा आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू होणार आहे. निवडणुकीत टोकार्ची ईर्ष्या होणार! दुसरीकडे, राज्यात गेल्या पाच वर्षांपासून कोणत्याही प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. महायुतीसह महाविकास आघाडीकडूनही अनेकांनी गेल्या चार महिन्यांपासून निवडणुकांची चाहुल लागताच तयारी सुरु केली आहे. यंदाचे गणेशोत्सवातही अनेक इच्छुकांनी गणेश मंडळांना हात सैल केला होता. त्यामुळे निवडणुकीतील चुरस पाहता कागदोपत्री खर्च सोडून मोठा खर्च होणार हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या.

📚 Related News