Health:आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना आपल्या (Health) काळजी घेणे जमत नाही, किंवा यात निष्काळजीपणा करतात. मात्र आजकाल तरुण वर्गामध्ये एक वेगळीच भीती सतावतेय. ती म्हणजे स्ट्रोकची. सध्या, स्ट्रोक केवळ प्रौढांमध्येच नाही तर तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. जाणून घ्या याची लक्षणं, जी फार कमी लोकांना माहीत.
नवी तील न्यूईरा हॉस्पिटलमधील प्रसिध्द न्यूरोसर्जन (मेंदू आणि मणका) डॉ. सुनील कुट्टी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. केवळ प्रौढांनाच नाही तर तरुणांनाही मोठी भीती (Symptoms Of Stroke) स्ट्रोक हे देशभरात मृत्यू आणि दीर्घकालीन अपंगत्वाचे एक प्रमुख कारण ठरत आहे. स्ट्रोकची कारणे म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या, रक्तवाहिनी फुटणे (हेमोरेजिक स्ट्रोक) आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, लठ्ठपणा आणि हृदयरोग यासारखे इतर घटक, ज्यामुळे स्ट्रोकची शक्यता वाढते. सध्या, स्ट्रोक केवळ प्रौढांमध्येच नाही तर तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो.
मेंदूच्या काही भागात रक्तपुरवठा खंडित किंवा कमी झाल्यास स्ट्रोकची समस्या उद्भवते, यामुळे मेंदूच्या पेशी मृत पावतात. स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा मेंदूच्या रक्तवाहिन्या अरुंद होतात. ज्यामुळे रक्त प्रवाह कमी होतो (इस्केमिक स्ट्रोक) किंवा रक्तवाहिनी फुटुन हेमोरेजिक स्ट्रोक होतो. अशावेळी तत्काळ वैद्यकीय उपचार करणे महत्वाचे आहे, कारण वेळीच उपचार रुग्णांच्या परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा करू शकतात. स्ट्रोकमुळे उद्भवणारी गुंतागुंत वेळेत उपचार न केल्यास, स्ट्रोकमुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते जसे की:शरीराच्या एका बाजूला अर्धांगवायू किंवा अशक्तपणा अस्पष्ट बोलणे गिळताना समस्या आणि जीव घाबरणे दृष्टीदोष किंवा अंधत्व स्मृती कमी होणे, मूड स्विंग किंवा नैराश्य वेळीच स्ट्रोकची लक्षणे ओळखा.
स्ट्रोक व्यवस्थापनात प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. कोणताही विलंब न करता स्ट्रोकची लक्षणे ओळखणे आणि वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. स्ट्रोकची लक्षणे ओळखण्यासाठी ‘बीफास्ट’ (BEFAST) ह्या संज्ञेचा वापर केला जातो. यात प्रत्येक अक्षर एक महत्त्वपूर्ण लक्षण दर्शवते. B – बॅलेंस (Balance):स्ट्रोक झालेल्या व्यक्तीला अचानक संतुलन बिघडण्याचा अनुभव येतो.
त्यांना नीट उभे राहता येत नाही किंवा चालताना अस्थिरता येऊ शकते. एकंदरीत, रुग्णाला बॅलन्स करता येत नाही. E – आईज (Eyes):स्ट्रोकमध्ये डोळ्यांच्या दृष्टीवर तात्काळ परिणाम होऊ शकतो. एका किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये अचानक अंधुकपणा किंवा दृष्टी कमी होणे ही लक्षणे असू शकतात. दृष्टीत त्रास उद्भवतो.
F – फेस (Face):चेहरा हा स्ट्रोकमधील मुख्य लक्षणांपैकी एक आहे. स्ट्रोक झाल्यास चेहऱ्याच्या एका बाजूला तिरकसपणा येतो, त्या व्यक्तीला हसणे कठीण होते किंवा चेहऱ्याचे काही भाग सुस्त होतात. A – आर्म्स (Arms):स्ट्रोकमुळे हाताचे कार्यप्रणाली कमी होते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला हात उचलताना अडचण येते, आणि हातात वजन राहत नाही. S – स्पीक (Speak):स्ट्रोक मध्ये बोलण्यास अडचणी येतात.
पीडित व्यक्तीची जीभ अडखळू लागते, शब्द नीट उच्चारता येत नाहीत किंवा काहीवेळा ती व्यक्ती अजिबात बोलू शकत नाही. T – टाइम (Time):वेळ हा स्ट्रोकच्या उपचारांसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. स्ट्रोकची कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णाला जवळच्या रुग्णालयात नेणे अत्यंत गरजेचे असते. एखाद्याचा अमूल्य जीव वाचू शकतो. डॉक्टर म्हणतात, ही लक्षणे त्वरित ओळखून त्यानुसार वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे.
लक्षणे दिसु लागल्यापासून 4. 5 तासांच्या आत दिल्यास इंट्राव्हेनस थ्रोम्बोलिसिस (क्लॉट-बस्टिंग इंजेक्शन) रक्त प्रवाह पुनर्संचयित करते. काही प्रकरणांमध्ये थ्रोम्बेक्टॉमी (मोठ्या रक्तवाहिन्यांमधून क्लॉट काढून टाकण्याची शस्त्रक्रिया) आवश्यक असते. उपचार जितक्या लवकर सुरू होतील तितके बरे होण्याची आणि जगण्याची शक्यता वाढते. स्ट्रोक ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे.
वेळीच लक्षणे जाणून घेतल्यास व निदान केल्यास एखाद्याचा अमूल्य जीव वाचू शकतो आणि आयुष्यभर अपंगत्व टाळू शकते. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ) Check out below Health Tools-.







